शुक्रवारी सकाळपासून मध्य प्रदेशातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने व मुसळधार पाऊस पडल्याने राज्यांतील शेतकरीसुद्धा खुश आहेत. जून महिन्यांतच राजधानी भोपाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. परिस्थिती अशी आहे की, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी जूनचा पाऊसकोटा जवळपास दुप्पटीने 13.08 सेमी वरून 24.68 सेंटीमीटरपर्यंत वाढला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जून महिन्यात आतापर्यंत शुक्रवारी रात्रीपर्यंत 32.25 सेमी पाऊस झाला आहे. आतापर्यंतच्या सर्वसाधारण पावसापेक्षा हे प्रमाण 27.65 सेमी जास्त आहे. हवामान केंद्रानुसार शनिवारी भोपाळ, होशंगाबाद, जबलपूर आणि रीवा विभागांतही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 ते 22 जून दरम्यान पूर्व मध्य प्रदेश, भोपाळ आणि होशंगाबाद विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्रोत: भास्कर
Share