गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचा प्रकोप होता, तो काहीसा कमी होऊ लागला आहे आणि आता अधूनमधून मान्सूनपूर्व पाऊस सुरूच राहणार आहे. 21 किंवा 22 मे पासून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पूर्व भारतामध्ये मेघगर्जनेसह सरी सुरू होतील.तसेच 23 आणि 24 मे रोजी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो. राजस्थान आणि गुजरातबरोबरच पश्चिम मध्य प्रदेशात उष्ण वातावरण राहील. अंदमान आणि निकोबार बेटे आणि दक्षिण भारतासह उत्तर पूर्व राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्रोत: स्काइमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.