शेतकर्यांना स्वस्त दरात कर्ज मिळावे यासाठी सरकारची एक विशेष योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आहे. या योजनेद्वारे सरकार किसान क्रेडिट कार्ड मोफत देते. गेल्या दोन वर्षात 2.24 कोटी शेतकर्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत.
किसान क्रेडिट कार्ड शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनांशी संबंधित असून कोणतेही शेतकरी घेऊ शकतात. याशिवाय दुसर्याच्या शेतात शेती करणारा शेतकरीही याचा फायदा घेऊ शकतो. 18 ते 75 वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेत सामील होण्यासाठी आधारकार्ड व पॅनकार्डचा फोटो तसेच इतर कोणत्याही बँकेत कर्जदार नसल्याचे प्रतिज्ञापत्र व अर्जदाराचा फोटो द्यावा लागतो. किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर (pmkisan.gov.in) आणि केसीसीशी संबंधित फॉर्म भरा. या प्रक्रियेत आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च करण्याची आवश्यकता नाही.
स्रोत: कृषी जागरण
Share