ही स्मार्ट सायकल बाईकपेक्षा कमी नाही, 30 पैशांमध्ये 5 किलोमीटर चालेल

20 ते 25 किलोमीटर अंतर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी टाटा इंटरनेशनल लिमिटेडच्या स्ट्राइडर (Stryder) ने दोन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. ही सायकल कोणत्याही बाईकपेक्षा कमी नाही.

या दोन सायकल आहेत, Contino ETB (कॉन्टिनो ईटीबी) 100 आणि Voltic (वोल्टीक) 1.7, दोन्ही इलेक्ट्रिक सायकल आहेत. Contino ETB 100 ही बाईक खूप परवडणारी असून चांगले मायलेज देखील देते. ही फक्त 6 पैसे प्रति किमीने खर्च करते, तसेच हिला एकदा चार्ज केल्यावर ती 60 किमी अंतर पर्यन्त चालू शकते.

ही बाइक Voltic 1.7 ग्रे आणि लाल या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तिची शक्तिशाली मोटर आणि भारी भक्कम लिथियम-आयन बॅटरीमुळे सर्वात जास्त स्पर्धात्मक ई बाइक बनलेली आहे. तिची बॅटरी 3 तासात पूर्णपणे चार्ज होते आणि 25 ते 28 किलोमीटर पर्यंत चालते.

स्रोत: आजतक

Share

See all tips >>