बनवा किसान पशू क्रेडिट कार्ड आणि मिळवा 3 लाख रु. पर्यंत कर्ज, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

बरेच शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीबरोबरच पशुसंवर्धन करतात. पशुसंवर्धनला चालना देण्यासाठी सरकार कमी व्याजदराने कर्जदेखील पुरवते. पशू किसान क्रेडिट कार्ड बनवून हे कर्ज शेतकऱ्यांना मिळू शकते.

सध्या ही योजना हरियाणा सरकारने सुरू केली आहे, परंतु लवकरच ही योजना इतर राज्यांतही सुरू होण्याची शक्यता आहे. या योजनेचा आतापर्यंत 56 हजार शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे.

हे कार्ड तयार करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक आहे. सर्वप्रथम केवायसी करणे बंधनकारक आहे. तसेच पासपोर्ट आकाराचे छायाचित्रदेखील सादर करावे लागेल. आपण आपल्या जवळच्या बँकेत जाऊन हे कार्ड बनवू शकता. आपण अर्ज केल्यानंतर एका महिन्यात आपल्याला पशू क्रेडिट कार्ड दिले जाईल.

स्रोत: कृषी जागरण

हेही वाचा: पशुधन विमा योजनेचा लाभ शेतकर्‍यांना मिळणार, गाई – गुरे यांच्या मृत्यूवर सरकार पैसे देईल.

फायदेशीर सरकारी योजनांविषयी माहितीसाठी ग्रामोफोनचा लेख दररोज नक्की वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून आपल्या मित्रांसह देखील शेयर करायला विसरू नका.

Share

See all tips >>