कांद्याची तोडणी आणि तोडणीनंतर वापरण्याचे तंत्रज्ञान:-
तोडणी:-
- वाणानुसार कांद्याचे पीक रोपणानंतर 3 ते 5 महिन्यात पक्व होते.
- रोपांचे वरील शेंडे झुकतात आणि खालील भाग फिकट पिवळा होतो तेव्हा कांदे काढण्याची सुयोग्य वेळ येते.
- उन्हाळ्यात जमीन कडक होते तेव्हा कंद जमिनीतून काढण्यास खुरपे वापरतात.
- रब्बी हंगामाच्या तुलनेत खरीप पिकात कमी उत्पादन मिळते.
पॅकिंग:-
- दूरवरच्या बाजारात ट्रक, रेल्वे किंवा विमानाने वाहतूक करण्यासाठी पॅकिंग करताना ज्यूट आणि जाळीदार पोत्यांचा वापर केला जातो.
- सामान्यता 40 कि.ग्रॅम क्षमतेच्या ज्यूट आणि जाळीदार पोत्यांचा वापर देशांतर्गत तर निर्यातीसाठी 6-25 कि.ग्रॅम क्ष्मतेच्या पिशव्या वापरल्या जातात.
- निर्यातीसाठी कांदा 14-15 कि.ग्रॅम क्षमतेच्या टोपल्यात देखील पॅक केला जातो.
वेचणी:-
- कंदाचे संस्करण केल्यावर हातांनी आणि मशिनने आकारानुसार वेगवेगळ्या श्रेणीत वर्गीकरण केले जाते.
- वर्गीकरण केलेल्या कांद्याची साठवण करण्यापूर्वी सडलेले, कापलेले आणि सदोष कांदे वेगळे काढावेत.
- वर्गीकरण करण्यापूर्वि कंदांच्या वरील सुकलेली टरफळे काढावीत. त्याने कांदे आकर्षक दिसतात.
- संस्कारित कांद्यांचे आकार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार वर्गीकरण केले जाते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share