पीएम किसान सन्मान निधीसाठी असलेली ई-केवायसीची अंतिम तारीख वाढवली, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक म्हणजे ‘पीएम किसान सन्मान निधी योजना’ होय. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6 हजार रुपये सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात.

दरवर्षी दर चार महिन्यांच्या कालावधीमध्ये 2 हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. आकडेवारीनुसार, देशातील सुमारे 10 कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

मात्र, मुदत देऊनही अनेक शेतकरी ई-केवायसी करू शकलेले नाहीत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देत त्याची अंतिम तारीख 31 मे ते 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी न केल्यास शेतकरी बंधू पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

ई-केवाईसी करण्याची प्रक्रिया :

ई-केवायसीसाठी पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या. येथे उजव्या बाजूला असणाऱ्या  फार्मर कॉर्नर या बटणावर असलेल्या ई-केवाईसी टॅबवर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल, येथे आधार क्रमांक टाका आणि सर्च टॅबवर क्लिक करा. आता तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल, तो आधार नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती ओटीपी सबमिट करा. अशा प्रकारे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.

स्रोत: आज तक

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share

See all tips >>