वादळ आणि पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी अनुदान दिले जाईल, लवकरच अर्ज करा

यावर्षी देशावर आलेल्या चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. पिकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून अनेक योजना चालवित आहे. या स्थितीमध्ये बिहार सरकारने वादळामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी बिहारमधील शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्जही मागवण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यातील शेतकरी 12 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या अर्जासाठी शेतकऱ्यांन प्रथम DBT मध्ये नोंदणी करावी लागते त्यानंतर अर्ज नोंदणी क्रमांकावरून केला जातो. या अर्जामध्ये काही चूक झाल्यास ती 48 तासांच्या आत दुरुस्त केली जाऊ शकते.

स्रोत: किसान समाधान

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share

See all tips >>