टोमॅटोनंतर हिरवी कोथिंबीर झाली महाग, किमतीमध्ये मोठी उछाल

वाढत्या महागाईचा परिणाम बाजारभावावरही दिसून येत आहे. लिंबू, टोमॅटो नंतर आता हिरव्या कोथिंबिरीच्या दरात वेगाने भाव वाढत आहे. कोथिंबिरीच्या भावाची स्थिती अशी आहे की, ज्या रुपयांत तुम्ही  कोथिंबीरीचा एक बंडल खरेदी कराल, त्याच रकमेमध्ये तुम्ही अनेक किलो कांदे खरेदी करू शकता.

किंमत वाढण्याचे कारण :

यावेळी असलेल्या कडक उन्हामुळे कोथिंबीरीच्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम झाला आहे. अतिउष्णतेमुळे त्याची नीट वाढ होऊ शकली नाही. उत्पादनात होत असलेली घट आणि बाजारपेठेत वाढती मागणी यामुळे त्याचे भाव वाढले आहेत म्हणूनच त्या कारणांमुळे 5 रुपयांना मिळणाऱ्या हिरव्या कोथिंबीरीचा एक बंडल आता 20 रुपयांना मिळत आहे.

मात्र, बाजारात कोथिंबिरीच्या भावात वाढ होत असल्याने शेतकरी बंधूंना चांगला नफा मिळत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खराब हवामानामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी बांधवांनी हिरव्या कोथिंबिरीची लागवड कमी केली आहे. ज्यामुळे गरमी पडून बाजारामध्ये त्याचे भाव आभाळाला भिडू लागले आहेत. 

स्रोत: टीवी9 भारतवर्ष

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share

See all tips >>