जैविक शेती ही अशी शेतीची पद्धत आहे, ज्यामध्ये पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि जमीन, पाणी आणि हवा प्रदूषित न करता नैसर्गिक समतोल राखता अधिक उत्पादन मिळते.
जैविक शेतीमध्ये रसायनांचा वापर केला जात नाही.
जैविक शेतीमध्ये रासायनिक शेतीपेक्षा कमी खर्चात उच्च दर्जाचे पीक मिळते.
जैविक शेतीमुळे जमिनीची सुपीकता ही आधिक वाढते.
यामध्ये, सिंचनाचा खर्च कमी आहे कारण जैविक खते जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकवून ठेवतात, त्यामुळे रासायनिक शेतीच्या तुलनेत सिंचनाची गरज कमी असते.
जैविक शेतीच्या वापराने पिकवलेल्या पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असतो परिणामी पिके पूर्णपणे रसायनमुक्त आणि आरोग्यदायी होतात.
जैविक उत्पादने आरोग्यासाठी सर्वोत्तम आहेत आणि त्यांचा वापर करून अनेक प्रकारचे रोग टाळता येतात.