घरी नैसर्गिक रंग बनवा आणि सुरक्षित होळी साजरी करा

लाल :

  • पाण्यात लाल चंदन पावडर मिसळून लाल रंग बनवा.
  • डाळिंबाची साल पाण्यात उकळवूनही लाल रंग तयार करता येतो.

हिरवा :

  • सुकी मेहंदी पावडर तुम्ही कोरडा हिरवा रंग म्हणून देखील वापरु शकता.
  • पालक, कोथिंबीर आणि पुदीन्याच्या पानांची पेस्ट पाण्यात एकत्रित करुन ओला हिरवा रंग बनवता येतो.

नारंगी:

  • पलाशच्या फुलांना रात्रभर पाण्यात भिजवून केशरी रंग बनवा.
  • हरसिंगारच्या फुलांना रात्रभर पाण्यात भिजवून केशरी रंग बनवता येतो.

पिवळा :

  • 50 झेंडूची फुले दोन लिटर पाण्यात उकळून घ्या आणि रात्रभर भिजवा त्यामुळे पिवळा रंग तयार होतो.
  • 1 चमचे हळद 2 लिटर पाण्यात घाला आणि ती चांगली मिसळून घ्या आणि जाड पिवळसर रंग बनवा.
Share

See all tips >>