मूग पीक 65 ते 70 दिवसांत पिकते, म्हणजेच मार्च-एप्रिल महिन्यांत पेरणी केलेले पीक मे-जून महिन्यापर्यंत तयार होते.
त्याचे दाणे तयार झाल्यावर फिकट तपकिरी किंवा काळ्या रंगाची होतात.
झाडांच्या शेंगा असमान पणे पिकतात. जर सर्व शेंगा पिकण्याची वाट बघितली तर जास्त पिकलेल्या शेंगा फुटायला लागतात त्यामुळे 2-3 वेळा शेंगा हिरव्या ते काळ्या रंगाच्या झाल्या कि तोडणी करा त्यानंतर संपूर्ण रोप काढून टाका.
अपरिपक्व अवस्थेत शेंगा काढणीमुळे धान्याचे उत्पादन व गुणवत्ता दोन्ही खराब होते.
विळ्याने पीक काढणीनंतर एक दिवस शेतात सुकवून घ्यावे, आणि नंतर मळणीसाठी कट्ट्यावर ठेवा. सुकल्यानंतर मळणी यंत्राने किंवा काठीने मळणी करून घ्या.
रोपावेटर चालवून पिकांंच्या अवशेषांना जमिनीत मिसळा जेणेकरून ते हिरवे खत म्हणून काम करेल. याद्वारे, 10 ते 12 किलो प्रति एकर एवढा नायट्रोजन मातीत तयार होऊन पुढील पिकाला मिळतो.