मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी गहू उत्पादनात मोठे यश संपादन केले आहे. कोरोना या जागतिक महामारीमुळे आणि देशव्यापी लॉकडाउन असूनही मध्य प्रदेश सरकारने गहू खरेदीप्रक्रियेत नवीन विक्रम नोंदविला आहे. याची घोषणा स्वत: शेतकरी कल्याण व कृषी विकास मंत्री कमल पटेल यांनी केली. याची घोषणा करत त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
या विषयावर कृषिमंत्री म्हणाले की, “शेतकर्यांच्या परिश्रमांमुळेच आज आपले राज्य गहू खरेदीच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आले आहे. यावर्षी शेतकर्यांनी बरेच गहू उत्पादन केले आहे. मध्य प्रदेश सरकारने 128 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्तीत जास्त गव्हाचे विक्रमी उत्पादन मिळवून, देशात प्रथम स्थान मिळवल्याचे स्पष्ट केेले आहे. पूर्वी गहू खरेदीच्या बाबतीत पंजाब राज्य प्रथम येत असे.
या गौरवशाली यशाबद्दल कृषिमंत्र्यांनी राज्यातील सर्व शेतकर्यांचे आणि गहू घेणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. मंत्री श्री. पटेल म्हणाले की, “शेतकर्यांच्या कठोर परिश्रमांमुळे मध्य प्रदेश सरकारला सलग 7 वेळा कृषी कर्मण पुरस्कार मिळाला आहे”. यांसह त्यांनी भविष्यातही राज्यातील शेतकरी या मार्गाने राज्याचा अभिमान बाळगतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
स्रोत: मध्य प्रदेश कृषी विभाग
Share