How to Save 20-25% of Nitrogen Fertilizer

नायट्रोजन उर्वरकात 20 -25 % बचत कशी करावी

  • अ‍ॅझोटोबॅक्टर हे स्वतंत्रजीवी नायट्रोजन स्थिरिकरण करणारे वायवीय जिवाणू असतात.
  • ते वायुमंडळातील नायट्रोजनचे मातीत स्थिरीकरण करतात.
  • त्यांचा वापर केल्यास पिकासाठी नायट्रोजन उर्वरक देण्याची आवश्यकता 20 % ते 25 % घटते.
  • हे जिवाणू रोपांच्या मुळांमध्ये वेगवेगळ्या जीवनसत्वे आणि जिब्रेलीनच स्राव निर्माण करतात. त्यामुळे बियाण्याचे अंकुरण अवकर होते, मूळसंस्था उत्तम वाढते आणि रोपांची पाणी आणि सूक्ष्म पोषक तत्वे शोषण्याची क्षमता वाढते.
  • बीजसंस्करण – अ‍ॅझोटोबॅक्टर ( सी.फ.यू.1 X108 ) :-  4 – 5 मिली /किलो बियाणे
  • मृदेतील वापर – अ‍ॅझोटोबॅक्टर ( सी.फ.यू.1 X108 ) 1 लीटर मात्रा 40-50 किलोग्रॅम उत्तम विघटित झालेल्या FYM/ खत किंवा गांडूळ खतात मिसळून पेरणीपुर्वी मातीत घालावे. उभ्या पिकात पेरणीनंतर 45 दिवसांनी सिंचन करण्यापूर्वी अ‍ॅझोटोबॅक्टर पसरून टाकता येते.
  • ठिबक सिंचन – अ‍ॅझोटोबॅक्टर (सी.फ.यू.1 X108 ) 1 लीटर मात्रा 100 लीटर पाण्यात मिसळून ठिबक सिंचनाद्वारे शेतात देता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>