नायट्रोजन उर्वरकात 20 -25 % बचत कशी करावी
- अॅझोटोबॅक्टर हे स्वतंत्रजीवी नायट्रोजन स्थिरिकरण करणारे वायवीय जिवाणू असतात.
- ते वायुमंडळातील नायट्रोजनचे मातीत स्थिरीकरण करतात.
- त्यांचा वापर केल्यास पिकासाठी नायट्रोजन उर्वरक देण्याची आवश्यकता 20 % ते 25 % घटते.
- हे जिवाणू रोपांच्या मुळांमध्ये वेगवेगळ्या जीवनसत्वे आणि जिब्रेलीनच स्राव निर्माण करतात. त्यामुळे बियाण्याचे अंकुरण अवकर होते, मूळसंस्था उत्तम वाढते आणि रोपांची पाणी आणि सूक्ष्म पोषक तत्वे शोषण्याची क्षमता वाढते.
- बीजसंस्करण – अॅझोटोबॅक्टर ( सी.फ.यू.1 X108 ) :- 4 – 5 मिली /किलो बियाणे
- मृदेतील वापर – अॅझोटोबॅक्टर ( सी.फ.यू.1 X108 ) 1 लीटर मात्रा 40-50 किलोग्रॅम उत्तम विघटित झालेल्या FYM/ खत किंवा गांडूळ खतात मिसळून पेरणीपुर्वी मातीत घालावे. उभ्या पिकात पेरणीनंतर 45 दिवसांनी सिंचन करण्यापूर्वी अॅझोटोबॅक्टर पसरून टाकता येते.
- ठिबक सिंचन – अॅझोटोबॅक्टर (सी.फ.यू.1 X108 ) 1 लीटर मात्रा 100 लीटर पाण्यात मिसळून ठिबक सिंचनाद्वारे शेतात देता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share