केंद्र सरकारच्या या योजनेतून महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जात आहे?

महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी भारत सरकार अनेक कल्याणकारी योजना चालवित आहे. यापैकी एक म्हणजे ‘पीएम फ्री शिलाई मशीन योजना’, या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, देशातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे. जेणेकरून त्या सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सक्षम होऊ शकतील.

पीएम फ्री शिलाई मशीन योजना काय आहे?

या योजनेच्या माध्यमातून देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील मजूर आणि असहाय्य महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येत आहे. जेणेकरून त्याही स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपली आणि आपल्या कुटुंबाची देखभाल करू शकतात. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील 50 हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. देशात जारी करण्यात आलेली ही योजना हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड, बंगाल, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये चालवली जात आहे. अशा परिस्थितीत या राज्यांतील महिला सरकारच्या या लाभदायक योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेसाठी असणाऱ्या अटी :

या योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळेल ज्यांचे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान असेल. त्याचबरोबर त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील प्रवर्गातील सर्व महिला मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्र असतील. यासोबतच अर्जदार कामगार महिलांच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 12,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची प्रक्रिया :

या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी विभागाने विहित केलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरावा लागेल. यासाठी त्यांना या योजनेसाठी असणारा अर्जाचा नमुना समाज कल्याण विभागाकडून मिळू शकतो. याशिवाय, अधिकृत वेबसाइट www.india.gov.in वर जाऊन फॉर्म डाउनलोड देखील केला जाऊ शकतो.

स्रोत: कृषि जागरन

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share

See all tips >>