प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्यांत सुमारे 8 कोटी 81 लाख लाभार्थ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. या शेतकर्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा सहावा हप्ता जमा झाला आहे.
या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले नसल्यास, एकदा आपला रेकॉर्ड तपासा. जेणेकरून, त्यामध्ये काही चुकत असेल तर वेळेत दुरुस्त करा. आधार कार्ड नंबर, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांक यात कोणतीही चूक नसल्याचे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. रेकॉर्डमध्ये काही प्रकारची चूक असल्यास आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
यावर्षी नोव्हेंबरपर्यंत सुमारे 1.75 कोटी रुपये शेतकऱ्यांना पाठविण्यात येणार आहेत. म्हणजेच पी.एम. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे मिळण्याची तारीख अद्याप संपलेली नाही.
स्रोत: कृषी जागरण
Share