मक्यास केव्हा आणि किती खत द्यावे
- शेवटच्या नांगरणीच्या वेळी उत्तम प्रतीचे शेणखत 10 टन प्रति एकर या प्रमाणात मिसळावे.
- मृदा परीक्षण अहवाल उपलब्ध नसल्यास यूरिया 20 किलो, डीएपी 70 किलो आणि पोटाश 35 किलो प्रति एकर या प्रमाणात पेरणीच्या वेळी द्यावे.
- पिकासाठीची मूलभूत मात्र माती, वाण आणि इतर घटकांवर अवलंबून असते.
- मक्याच्या पिकासाठी एकूण 60-72 किग्रॅ/ एकर युरीयाची आवश्यकता असते. यूरियाची पूर्ण मात्रा पुढीलप्रमाणे द्यावी:
क्र. | पिकाची अवस्था | नायट्रोजन (%) |
1 | मूलभूत (पेरणीच्या वेळी) | 20 |
2 | V4 (चार पाने उगवल्यावर) | 25 |
3 | V8 (आठ पाने उगवल्यावर) | 30 |
4 | VT (फोलोरा आल्यावर) | 20 |
5 | GF (दाणे भरताना) | 5 |
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share