Fall army worm :- Nature of Damage and Control measures

लष्करी अळीच्या किडीपासून होणारी हानी आणि तिच्यापासून बचाव

या किडीचा भारतातील पहिला हल्ला कर्नाटक राज्यात जुलै 2018 मध्ये आढळून आला. त्यानंतर ती इतर राज्यातही पसरली. मक्याच्या पिकाची हानी करणारी ही कीड इतर किडींच्या तुलनेत जास्त वेळ जीवंत राहते. या किडीचे पतंग हवेच्या प्रवाहाबरोबर रातोरात सुमारे 100 किलोमीटर पर्यंत उडत जाऊ शकतात. एक मादी तिच्या जीवनकाळात 1 ते 2 हजार अंडी देते. या किडीची केवळ मोठी लोकसंख्याच नाही तर ती ज्या प्रकारे पीक खाते ते देखील मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवते. हे किडे झुंडीने धाड घालतात. त्यामुळे काही वेळातच पूर्ण पीक नष्ट होते. ही बहुभक्षी कीड जवळपास 80 प्रकारची पिके खाते पण तिला मका प्रिय आहे.

  • हे किडे सामान्यता पाने खातात पण हल्ला तीव्र असल्यास ते कणसे देखील खातात.
  • हल्ला केलेल्या रोपाची वरच्या बाजूची पाने कापलेली-फाटलेली असतात आणि अंकुराजवळ दमट भुरा दिसतो.
  • ते कणसे वरील बाजूने खायला सुरुवात करतात.

नियंत्रण

  • प्रकाश सापळे लावावेत
  • शेतात प्रत्येक एकरात 5 फेरोमोन ट्रॅप लावावेत
  • बिवेरिया बेसियाना @ 1 किलो/ एकर या प्रमाणात फवारावे
  • फ्लूबेंडामीड 480 एससी @ 60 मिली/ एकर
  • स्पिनोसेड 45% एससी @ 80 मिली/ एकर
  • थायोडिकार्ब 75% डब्ल्यूपी @ 400 ग्रॅम/ एकर
  • क्लोरॅट्रानिलिप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/ एकर

यापैकी कोणतेही एक कीटकनाशक एकरी 150 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How much and when apply fertilizer in corn:

मक्यास केव्हा आणि किती खत द्यावे

  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी उत्तम प्रतीचे शेणखत 10 टन प्रति एकर या प्रमाणात मिसळावे.
  • मृदा परीक्षण अहवाल उपलब्ध नसल्यास यूरिया 20 किलो, डीएपी 70 किलो आणि पोटाश 35 किलो प्रति एकर या प्रमाणात पेरणीच्या वेळी द्यावे.
  • पिकासाठीची मूलभूत मात्र माती, वाण आणि इतर घटकांवर अवलंबून असते.
  • मक्याच्या पिकासाठी एकूण 60-72 किग्रॅ/ एकर युरीयाची आवश्यकता असते. यूरियाची पूर्ण मात्रा पुढीलप्रमाणे द्यावी:
क्र. पिकाची अवस्था नायट्रोजन  (%)
1 मूलभूत (पेरणीच्या वेळी) 20
2 V4 (चार पाने उगवल्यावर) 25
3 V8 (आठ पाने उगवल्यावर) 30
4 VT (फोलोरा आल्यावर) 20
5 GF (दाणे भरताना) 5

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fall army worm :- Nature of Damage and Control measures

लष्करी अळीने होणारी हानी आणि बचावासाठी उपाययोजना

हानी:-

  • ही कीड सामान्यता पाने खाते पण हल्ला तीव्र असल्यास ती कणसे देखील खाते.
  • हल्ला केलेल्या रोपांची वरील बाजूची पाने कुरतडलेली-फाटलेली दिसतात आणि कोवळ्या देठांच्या जवळ दमट भुरा दिसतो.
  • ती कणसे वरील बाजूने खाण्यास सुरुवात करते.

नियंत्रण :-

  • प्रकाश सापळे लावावेत
  • शेतात प्रत्येक एकरात 5 फेरोमोन ट्रॅप लावावेत
  • बिवेरिया बेसियाना @ 1 किलो/ एकर या प्रमाणात फवारावे
  • फ्लूबेंडामीड 480 एससी @ 60 मिली/ एकर
  • स्पिनोसेड 45% एससी @ 80 मिली/ एकर
  • थायोडिकार्ब 75% डब्ल्यूपी @ 400 ग्रॅम/ एकर
  • क्लोरॅट्रानिलिप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/ एकर

यापैकी कोणतेही एक कीटकनाशक एकरी 150 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Maize:- Basis for Selection of Variety

मक्याचे वाण कशाच्या आधारे निवडावे

 

6240 + सिनजेंटा 5 किलो / एकर 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी. खरीप आणिजायद नारिंगी पिवळा उत्कृष्ट टोक, बोल्ड कर्नेल असलेली समान आणि आकर्षक रोपे, अनेक जागांसाठी अनुकूल हायब्रिड वाण, व्यवस्थापनासाठी उत्तम. 6240 हून अधिक उत्पादन देते कारण कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरुन बिजसंस्करण केलेले असते.
सिनजेंटा एस 6668 5 किलो / एकर 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी खरीप आणि जायद नारिंगी उच्च व्यवस्थापन असलेल्या सिंचित भागासाठी उपयुक्त, आकर्षक नारिंगी कर्नेल आणि टोकापर्यंत दाणे भरतात. मोठी कणसे उच्च उत्पादन.
पायनियर 3401 5 किलो / एकर 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी खरीप आणि जायद नारिंगी पिवळा शेलिंग 80-85 % पर्यन्त होते. एका कणसात 16-20 ओळी असतात. केश नारिंगी असतात. कणसात दाणे टोकापर्यंत भरतात. दीर्घ अवधि सुमारे 110 दिवस, उत्पादन सुमारे 30-35 क्विंटल

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Management in Corn

मक्यातील तणाचे नियंत्रण

  • एट्राजीन 50% डब्लू.पी. @500 ग्रॅम/ एकर 200 लीटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी अंकुरणापूर्वी वापरावे.
  • पेरणीनंतर 20-25 दिवसांनी किंवा 4-5 पाने फुटल्यावर 2,4-D डायमेथाइल अमीन सॉल्ट 58% एस.एल.@ 600 मिली/ एकरचे द्रावण फ्लॅट पॅन नोझलने फवारावे.
  • तणाला 4-6 पाने फुटलेली असताना टेम्बोट्रायोन 42% एससी @ 115 मिली/ एकर फवारावे.
  • तणनाशकाचा वापर करताना मातीत पुरेशी ओल हवी.
  • तणनाशकाचा वापर केल्यावर मातीची हलवाहलव करू नये.
  • कडधान्याबरोबर पेरणी केली असल्यास एट्राजीन आणि 2,4-D वापरू नये. त्याऐवजी पेंडीमेथलीन @ 300 ग्रॅम/ एकर अंकुरणापूर्वी पेरणीनंतर 3-5 दिवसात वापरावे. |

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Qualities of selected Maize Variety

मक्याच्या निवडक वाणांची वैशिष्ठ्ये

 

क्रमांक . वाणाचे नाव बियाण्याचे प्रमाण रोपातील दूरी पेरणीची खोली पेरणीची वेळ दाण्यांचा रंग अधिक माहिती
1 ADV 759 8 किलो/ एकर 60 सेमी x 22.5 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी खरीप -115-120 दिवस, रब्बी -125-135 दिवस अधिक उगवणक्षमता, समान लांबीची कणसे, टोकापर्यंत भरतात आणि मोठे दाणे, ओळींची संख्या 14, पावसावर अवलंबून भागासाठी उपयुक्त
2 PAC 751 एलीट 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी. खरीप -115-120 दिवस, रब्बी -125-135 दिवस नारिंगी पिवळा पावसावर अवलंबून भागासाठी उपयुक्त, समान आकाराचे लहान नारिंगी पिवळे दाणे, उच्च शेलिंग टक्केवारी  (85%)। 18-20 ओळी, रोपाची ऊंची 5.5-6.5 फुट (मध्यम), उत्पादन – 30 क्विंटल/ एकर, रुंद पाने,  कणसे परिपक्व झाल्यावर देखील रोपे हिरवी रहातात त्यामुळे चार्‍यासाठी उपयुक्त.
3 6240 सिनजेंटा 5 किग्रा / एकड़ 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी खरीप आणि जायद (80-85 दिवस) नारिंगी पिवळा चार्‍यासाठी उपयुक्ता वाण, अधिक उगवण, दाणे टोकापर्यंत भरतात, सेमी-डेंट प्रकारचे दाणे,  रोपे परिपक्व झाल्यावर देखील हिरवी राहतात. जवळपास सगळ्या जागांसाठी अनुकूल. चांगले उत्पादन, अंकुर आणि मूळ कुजव्या रोगासाठी आणि तांबेर्‍यासाठी प्रतिकारक्षमता असलेले वाण.

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer Management in Maize leads to more yield

मक्यातील उपयुक्त उर्वरक व्यवस्थापनाने भरघोस उत्पादन

  • मक्याच्या भरघोस उत्पादनासाठी उर्वरकांच्या संतुलित मात्रा वापराव्यात.
  • मक्याचे पीक घेण्यापूर्वी शेतात 8-10 टन/ एकर या प्रमाणात शेणखत मिसळावे.
  • पेरणीच्या वेळी यूरिया @ 65 किलो/ एकर + डीएपी @ 35 किलो/ एकर + एमओपी @ 35 किलो/ एकर + कार्बोफ्यूरान @ 5 किलो/ एकर या प्रमाणात मात्रा जमिनीतून द्याव्यात.
  • पेरणीनंतर 15-20 दिवसांनी मॅग्नेशियम सल्फेट @ 10 किलो/ एकर + झिंक सल्फेट @ 10 किलो/ एकर + झियोरायझा @ 8 किलो/ एकर या प्रमाणात द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of fall armyworm in Maize

मक्याच्या पिकावर झुंडीने हल्ला करणार्‍या लष्करी अळीचे नियंत्रण:-

हानी:-

  • की कीड सामान्यता पाने खाते. तीव्र हल्ला झाल्यास ती मक्याची कणसे देखील कुरतडते.
  • किडीने ग्रासलेल्या रोपाची वरील बाजूची पाने फाटतात आणि पाने आणि देठांच्या जोडाजवळ दमट भुस्सा साचलेला आढळून येतो.
  • ही कीड कणीस खाण्यास वरील बाजूने सुरुवात करते.

नियंत्रण :-

  • लाईट ट्रॅप लावावेत.
  • मादीचा गंध असलेले फेरोमान ट्रॅप एकरात 5 या प्रमाणात लावावेत.
  • अळी आढळताच पुढीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी:-
  • एमामेक्टीन बेंजोएट 5% SG @ 100 ग्रॅम प्रति एकर
  • फिप्रोनिल 5% SC @ 400 मिली प्रति एकर
  • क्लोरोपाइरीफॉस 50% EC @ 400 मिली प्रति एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share