या योजनेतून विद्यार्थ्यांना 4000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळते

मध्यप्रदेश सरकार गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा किरण योजना राबवित आहे. या योजनेअंतर्गत अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यांची आर्थिक परिस्थिती घरची चांगली नसते ज्यामुळे त्यांना शाळा व कॉलेजमध्ये जाता येत नाही. या योजनेअंतर्गत 4000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. जे विद्यार्थी बारावीमध्ये प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेचा लाभ फक्त बीपीएल आणि एससी / एसटी कुटुंबातील विद्यार्थी घेऊ शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थीकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच अर्जासाठी एक फोटो, आधारकार्ड, चारित्र्य प्रमाणपत्र किंवा शालेय गुण प्रमाणपत्र पाहिजे.

आपण या योजनेसाठी ऑनलाईनद्वारे अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Register Yourself’ या पर्यायावरती जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

स्रोत: कृषी जागरण

Share

See all tips >>