शेती कामात पीक सिंचनाला महत्त्वाचे स्थान आहे आणि हे लक्षात घेऊन, सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचई योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन उपकरणे खरेदीवर अनुदान मिळते.
या योजनेअंतर्गत सर्वसाधारण शेतकर्यांना 80% पर्यंत अनुदान दिले जाते, तर 90% पर्यंत अनुदान लहान व सूक्ष्म शेतकऱ्यांना दिले जाते. या योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
नोंदणीकृत फर्मकडून सिंचन उपकरणे खरेदी केल्यानंतर शेतकर्यांना बिलांसह अर्ज कार्यालयात जमा करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चावर 80 ते 90% अनुदान दिले जाते. या योजनेसाठी केंद्राकडून 75% अनुदान दिले जाते, तर 25% राज्य सरकार खर्च करते.
स्रोत: कृषी जागरण
Share