ओडिशावरती तयार झालेले एक डिप्रेशन आता मध्य प्रदेशमध्ये पोहोचेल आणि ते डिप्रेशन आता हळूहळू कमकुवत होण्यास सुरुवात होईल. पुढील काही दिवसांच्या दरम्यान ओडिशासह उत्तर तेलंगणा, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेशसह मुंबई, पूर्व राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच गुजरात आणि मुंबईमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणार आहे. तसेच 14 आणि 15 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या पश्चिम जिल्ह्यांसह दिल्ली आणि हरियाणामध्ये मुसळधार पाऊस पडेल.
Shareस्रोत: स्काइमेट वेदर
हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.