आधुनिक यंत्रे आणि नवीन तंत्रज्ञानावर भारी अनुदान मिळत आहे, लवकरात लवकर अर्ज करा

देशभरातील सर्व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, म्हणूनच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी   केंद्र आणि राज्य सरकार अनेक फायदेशीर योजना चालवत आहेत. याच क्रमामध्ये सरकारकडून कृषी क्षेत्रात आधुनिकतेला अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीत अधिक नफा मिळू शकेल. यासाठी सरकारकडून कृषी यंत्रसामग्री आणि नवीन तंत्रज्ञान खरेदीवर अनुदान दिले जात आहे.

सोलर पंप, ड्रिप, फार्मपौण्ड आणि डिग्गीवरती अनुदान :

या क्रमामध्ये राजस्थान सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानावरती ठिबक सिंचनासाठी सिंचन यंत्रे उपलब्ध करुन देत आहे. यासाठी राज्य सरकारने 1 लाख 60 हजार शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्याच वेळी, 9,738 फार्मपौण्ड आणि 1,892 डिग्गीच्या बांधकामासाठी अनुदान आधीच जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय राज्यात 22,807 सौरपंप उभारण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 

लवकर अर्ज करा :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://rajkisan.rajasthan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथे, शेतीशी संबंधित सर्व योजनांसाठी, फार्मपौण्ड, डिग्गी, ड्रिप इरिगेशन आणि सोलर पंप असे पर्याय दिले आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती मिळवू शकता, यासोबतच तुम्ही या पोर्टलवर ऑनलाइन अर्जही करू शकता.

स्रोत : कृषि समाधान

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share

See all tips >>