केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दीष्ट समोर ठेवून दुग्ध क्षेत्रासाठी एक मोठे पॅकेज जाहीर केले आहे. या घोषणेनंतर माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर म्हणाले की, “आता मानवाप्रमाणेच प्राण्यांसाठी देखील अॅम्ब्युलेन्स सेवा सुरू केली जाईल. सुदूर गावे व दुर्गम भागात आता पशुपालकांना त्यांच्या प्राण्यांच्या उपचारासाठी भटकंती करावी लागणार नाही त्यांच्यासाठीही अॅम्ब्युलेन्स सेवा सुरू केली जाईल.
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकुर म्हणाले की, “सरकारने पशुसंवर्धन विकास योजना जाहीर केली, त्याअंतर्गत अंदाजे 54618 करोड़ रुपयांची गुंतवणूक होईल. हा निर्णय ग्रामीण भारताच्या विकासाशी संबंधित आहे. यामुळे शेतकरी व पशुपालकांच्या जीवनात बदल होईल व यावर केंद्र सरकार 9800 करोड़ रुपये खर्च करेल. ”
स्रोत: टीवी 9 भारत वर्ष
Shareफायद्याच्या सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करण्यास विसरू नका.