येत्या 24 तासांत या राज्यांत हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

जुलै महिन्याच्या अखेरीस संपूर्ण देशात मान्सूनने जोर धरला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यांच्या बहुतांश भागांंत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत उत्तर भारतातील बर्‍याच भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या 24 तासांत कोकण, गोवा, केरळ, तामिळनाडू, किनारी कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण मध्य प्रदेश, दक्षिण राजस्थान, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशांंत हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. उत्तर आणि पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, ओडिशा, गंगा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला आहे.

येत्या 24 तासांत कोकण, गोवा आणि तटीय (किनारपट्टी) कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, गुजरात, मध्य महाराष्ट्र, दक्षिण राजस्थान, दक्षिण मध्य प्रदेश आणि अंदमान व निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडेल. त्याचवेळी, हलका पाऊस पडल्यामुळे बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा आणि केरळमध्ये एक-दोन ठिकाणी मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.

स्रोत: कृषी जागरण

Share

See all tips >>