- प्लास्टिक मल्चिंग तरबूज की फसल में लगने वाले कीड़ों, बीमारियों और खरपतवारों से बचाती है।
- काले रंग की पॉलिथीन के द्वारा खरपतवारों का नियंत्रण किया जाता है और साथ ही हवा, बारिश व सिंचाई से होने वाले मृदा कटाव को भी यह रोकती है।
- पारदर्शी पॉलीथिन का उपयोग मृदा जनित रोगों और नमी संरक्षण को नियंत्रित करने में किया जाता है।
भोपळा, कारले, काकडी, कलिंगड इत्यादी पिकांच्या शेतीसाठी कोणते हवामान योग्य आहे?
- वेलवर्गीय भाज्या या उपोष्ण कटिबंधीय हवामानात होतात आणि त्यांची उत्तम वाढ होण्यासाठी आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी त्यांना उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते
- त्यांची चांगली वाढ आणि उत्तम फळधारणा होण्यासाठी रात्र आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे १८ ते २२ डिग्री सेल्सिअस आणि ३० ते ३५ डिग्री सेल्सिअस असणे योग्य आहे.
- २५ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमानाला बिया उत्तम प्रकारे आणि वेगाने रुजून येतात.
- योग्य तापमानाला वाढवलेल्या रोपांना मादी फुले आणि फळे जास्त प्रमाणात येतात.
सिंचनाचा वापर करून कलिंगडाचे उत्पादन कसे वाढवावे
- कलिंगड सिंचनाला उत्तम प्रतिसाद देते पण त्याला पाणी साचलेले सोसत नाही.
- हे सर्वसाधारण उन्हाळी पीक असून त्यासाठी सिंचनाची वारंवारिता महत्वाची असते.
- पिकाला 3-5 दिवसांनी सिंचन करावे.
- फुलोऱ्यापूर्वी, फुलोऱ्याच्या वेळी आणि फळाच्या विकासाच्या अवस्थेत मातीतील आद्रतेच्या अभावाने आलेल्या ताणाने उत्पादन लक्षणीयरीत्या घटते.
- परिपक्वतेच्या वेळी सिंचन थांबवावे अन्यथा फळांची गुणवत्ता घसरते आणि फळे तडकण्याचे प्रमाण वाढते.
कलिंगडाचे काही महत्वाचे वाण
अनु. क्र. | वाणाचे नाव | फळाचा आकार | फळाचे वजन (किग्रॅ) | कालावधी
(दिवस) |
फळाचा रंग |
1. | सागर किंग | अंडाकार | 3-5 | 60 – 70 | गडद काळी साल आणि लाल गर |
2. | सागर किंग प्लस | अंडाकार | 3-5 | 60 – 70 | गडद काळी साल आणि लाल गर |
2. | काजल | अंडाकार | 3- 3.5 | 60 – 70 | गडद हिरवी साल आणि गुलाबी गर |
4. | 2208 | अंडाकार | 2-4 | 70 – 80 | गडद काळी साल आणि लाल गर |
कलिंगडाच्या लागवडीसाठी जमिनीची मशागत
- कलिंगडाची लागवड अनेक प्रकारच्या मातीत करता येते पण त्यासाठी हलकी, रेताड, पाण्याचा सहज निचरा होणारी सुपीक लोम माती उत्तम असते.
- पेरणीपूर्वी मातीत भरपूर प्रमाणात कंपोस्ट खत मिसळावे आणि उत्तम मिसळावे.
- खोलवर नांगरणी करून आणि कुदळणी करून आणि इतर रोपांचा कचरा काढून शेत नीट तयार करावे.
- दक्षिणेच्या बाजूला किंचित उतार ठेवणे उत्तम.
- शेतातील माती नीट पालटून आणि समपातळीत आणून 2 मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
कलिंगड पेरणीसाठी योग्य वेळ
- नोव्हेंबर ते मार्च हा काळ कलिंगडाच्या पेरणीसाठी उत्तम असतो.
- नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात पेरणी केल्यावर रोपाला गोठण्यापासून संरक्षण द्यावे लागते. त्यामुळे बहुतेक पेरणी जानेवारी ते मार्च या काळात केली जाते.
- डोंगराळ भागात कलिंगडाची पेरणी मार्च ते एप्रिलमध्ये केली जाते.
Management of melon worm in watermelon
कलिंगडातील फळ पोखरणार्या किडीचे नियंत्रण
- अळ्या पाने आणि फुले खातात.
- कधीकधी अंड्यातून निघाल्यावर लगेचच या किडीचे भुंगे/ अळ्या फळात प्रवेश करून हानी पोहोचवतात.
- प्रभावी नियंत्रणासाठी पेरणीपुर्वी शेतात खोल नांगरणी करून किड्यांचे कोश नष्ट करावेत.
- या किड्यांची संख्या उन्हाळ्यात घटते. त्यानुसार पेरणीची वेळ ठरवावी.
- तणाचे योग्य प्रकारे नियंत्रण करावे.
- सायपरमेथ्रिन 10% ईसी @ 350-500 मिली/ एकर फवारावे.
- किंवा फिप्रोनिल 5% एससी @ 250-300 मिली/ एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareControl of mosaic virus in watermelon
कलिंगडावरील केवडा रोगाच्या मोझेक व्हायरसचे नियंत्रण
- या रोगाची सुरुवातीची लक्षणे पानांवर दिसतात आणि नंतर देठ आणि फळांवर देखील पसरतात.
- ग्रस्त रोपांच्या फळांचा आकार बदलतो. फळे लहान राहतात आणि फांद्यांवरून गळून पडतात.
- हा रोग माव्याद्वारे पसरतो.
- या रोगापासून बचावासाठी पीक चक्र अवलंबावे आणि रोगमुक्त बियाणे वापरावे.
- रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @70-100 मिली/एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareControl of fusarium wilt in watermelon
कलिंगडातील मर रोगाचे नियंत्रण
- रेताड मातीत हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो.
- संक्रमित रोपे नष्ट करावीत.
- रोगमुक्त बियाणे वापरावे.
- पेरणीपुर्वी कार्बेन्डाजिम @ 2 ग्रॅम/किलोग्रॅम वापरुन बीजसंस्करण करावे.
- कलिंगडाच्या रोपांवर रोग दिसताच प्रॉपिकोनाझोल @ 80-100 मिली/एकर वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareMaturity signs of watermelon
कलिंगडाच्या फळाच्या परिपक्वतेची लक्षणे
- पेरणीनंतर 90 -120 दिवसांनी फळे तोडण्यायोग्य होतात.
- पिकलेल्या फळांवर हाताने थाप मारल्यास जड आवाज येतो पण कच्च्या फळावर थाप मारल्यास धातुसारखा (मेटॅलिक) आवाज येतो.
- फळाचा जमिनीवर टेकलेल्या भागाचा रंग पांढर्यापासून बदलून पिवळा होऊ लागतो.
- फळाचा देठ सुकू लागतो.
- काही वाणात फळाच्या पृष्ठभागावर हात फिरवून परिपक्वतेचा अंदाज घेता येतो.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share