कलिंगडाचे काही महत्वाचे वाण

 

अनु. क्र.  वाणाचे नाव  फळाचा आकार  फळाचे वजन (किग्रॅ) कालावधी 

   (दिवस)

फळाचा रंग 
1. सागर किंग  अंडाकार  3-5  60 – 70 गडद काळी साल आणि लाल गर 
2. सागर किंग प्लस  अंडाकार  3-5  60 – 70 गडद काळी साल आणि लाल गर 
2. काजल  अंडाकार  3- 3.5 60 – 70 गडद हिरवी साल आणि गुलाबी गर 
4. 2208 अंडाकार  2-4 70 – 80 गडद काळी साल आणि लाल गर 
Share

उन्हाळ्यात उच्च उत्पादन देणारी मुगाची वाणे

उन्हाळ्यात उच्च उत्पादन देणारी मुगाची वाणे

  • विराट, सम्राट, खरगोन 1, कृष्णा 11, जवाहर 45, कोपरगाँव, मोहिनी (S-8), PS 16, पंत मूग 3, पूसा 105, ML 337, पीडीएम 11 (बसंत) टाइप 1, टाइप 4, टाइप 51, K851, पूसा बैसाखी, 6, PS 10, PS 7, पंत मूग 2, ML-267, पुसा 105, ML-337, पंत मूग 1, RUM-1, RUM-12, बीएम -4, पीडीएम -54, जेएम -72, के -851, पीडीएम -11.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Popular varieties of chilies preferred by farmers of Madhya Pradesh

मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांकडून पसंत केली जाणारी मिरचीची लोकप्रिय वाणे

निमाड़ भागातील  शेतकरी एप्रिल महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात मिरचीच्या नर्सरीची तयारी सुरू करतात. पेरणीपुर्वी 5-7 दिवस वाण निवडावे. भरघोस उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड आवश्यक असते. वाणाची निवड शेतीच्या उद्देशावर अवलंबून असते. त्यामुळे वेगवेगळ्या उद्देशांसाठी लोकप्रिय वाणांबाबत येथे माहिती दिलेली आहे:

हिरव्या मिरचीच्या तोडणीसाठी उपयुक्त वाणे:-

  • नंदिता (नन्हेम्स)
  • एचपीएच -12 (सिजेंटा)
  • उजाला (नन्हेम्स)
  • एमएचसीपी 310 – तेजा (महिको)

शेतकरी बंधु कोरड्या मिरचीच्या उत्पादनासाठी लागवड करणार असल्यास उपयुक्त वाणे:-

  • सोनल (रासी सीड्स)
  • यूएस 720 (नन्हेम्स)
  • यूएस 611 (नन्हेम्स)
  • एचपीएच -12 (सिजेंटा)

विषाणू प्रतिरोधक वाणे :-

  • एचपीएच -12 (सिजेंटा)
  • सोनल (रासी सीड्स)
  • प्राईड (रासी सीड्स)
  • नंदिता (नन्हेम्स)

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Improved Varieties of Soybean and their selection

सोयाबीनची प्रगत वाणे आणि त्यांची निवड

सोयाबीनची प्रगत वाणे:- वाणांची निवड मातीचा प्रकार आणि हवामानानुसार करावी. हलक्या जमिनीत आणि पावसावर अवलंबून असलेल्या भागात जेथे सरासरी पर्जन्यमान 600 ते 750 मि.मी. आहे तेथे लवकर (90-95 दिवसात) तयार होणारी वाणे वापरावीत. मध्यम लोमी जमिनीत जेथे सरासरी पर्जन्यमान 750 ते 1000 मिमी. असेल त्या भागात मध्यम अवधीत तयाऱ होणारी (100 ते 105 दिवसात) वाणे वापरावीत. 1250 मिमी. हून अधिक पर्जन्यमान असलेल्या भागातील भारी जमिनीत उशिरा तयार होणारी वाणे वापरावीत. बियाण्याची अंकुरण क्षमता 70 टक्क्यांहून अधिक आहे याकडे विशेष लक्ष द्यावे. भरघोस पिकासाठी 40 रोपे प्रति वर्ग मीटर या प्रमाणात पेरणी करावी. प्रमाणित बियाणेच निवडावे.

मध्य प्रदेशसाठी उपयुक्त सोयाबीनची प्रगत वाणे:-

क्र. जातीचे नाव कालावधी दिवसात हेक्टरी उत्पादन
1. JS-9560 82-88 18-20
2. JS-9305 90-95 20-25
3. NRC-7 90-99 25-35
4. NRC-37 99-105 30-40
5. JS-335 98-102 25-30
6. JS-9752 95-100 20-25
7. JS-2029 93-96 22-24
8. RVS-2001-4 92-95 20-25
9. JS-2069 93-98 22-27
10. JS-2034 86-88 20-25

स्रोत:-https://iisrindore.icar.gov.in/

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Criteria of Selection of Cotton Variety

कापणाच्या वाणाची निवड करताना लक्षात ठेवण्याच्या बाबी:-

प्रतिरोधकता:- निवडलेले वान कीटक आणि रोग प्रतिरोधक असावे.

स्थिर उत्पादन:- उत्पादन स्थिर असणे हा चांगल्या जातीचा गुण असतो. वेगवेगळ्या वातावरणात देखील चांगले उत्पादन देण्याची क्षमता वाणात असावी.

परिपक्वतेचा कालावधी:- परिपक्वतेचा कालावधी म्हणजे बियाण्याची पेरणी केल्यापासून कापणीपर्यंत लागणारा काळ. कापसाच्या वाणांचे सामान्यता लवकर, मध्यम आणि उशिरा परिपक्व होणार्‍या वाणाच्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते.

सुताची गुणवता:- सुताच्या गुणवत्तेचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम उत्पादनाच्या किंमतीवर होतो. सुताची गुणवत्ता सुताची लांबी, मजबूती आणि समानता यावर आनुवंशिकतेचा मोठा प्रभाव असतो तर त्यावर पर्यावरणाचा खूप कमी प्रभाव असतो.

पाण्याची उपलब्धता:- वाणाची निवड करताना पाण्याची व्यवस्था काय आहे हे पहावे आणि आपल्याला सिंचित, अर्धसिंचित की पावसावर अवलंबून असलेल्या वाणाची आवश्यकता आहे ते ठरवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share