कांद्यावरील स्टेम्फिलियम ब्लाइट रोगाची लक्षणे आणि त्याचे नियंत्रण
स्टेमफाईटम ब्लाइट रोग:- पानांमध्ये लहान पिवळे ते नारंगी डाग किंवा रेषा उमटतात आणि वाढून जाळ्याच्या आकाराचे अंडाकृती होतात. डागांच्या सर्व बाजूंनी गुलाबी कडा असणे हे या रोगाचे लक्षण आहे. डाग पानांच्या कडावरुन खालच्या बाजूला वाढत जातात. डाग एकमेकात मिसळून मोठे होत जातात. पाने जळालेली दिसतात. रोपाच्या सर्व पानांना लागण होते. पुनर्रोपणानंतर 30 दिवसांनी 10-15 दिवसांच्या अंतराने किंवा रोगाची लक्षणे दिसू लागल्यावर जिवाणूनाशक मेन्कोजेब 75%WP @ 50 ग्रॅम प्रति पम्प, ट्रायसाईकलाज़ोल @ 20 मिली प्रति पम्प, हेक्सकोनाज़ोल @ 20 मिली, प्रोपिकोनाज़ोल @ 20 मिली प्रति पम्प यांची फवारणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share