Improved Variety of Soybean :- NRC-7

सोयाबीनचे उन्नत वाण एन.आर.सी  – 7

  • हे मध्यम अवधीचे वाण असून सुमारे लगभग 90-99 दिवसात तयार होते.
  • 100 दाण्यांचे वजन13 ग्रॅमहून अधिक असते.
  • रोपांची वाढ कमी असल्याने कापणीस सोयिस्कर असते आणि परिपक्व झाल्यावर देखील शेंगा फुटत नाहीत. त्यामुळे उत्पादनाची हानी होत नाही.
  • फुलांचा रंग जांभळा असतो. गर्डल किडे आणि खोडमाशी प्रतिरोधकता हे या वाणाचे वैशिष्ट्य आहे.
  • या वाणाचे उत्पादन 10-12 क्विंटल/ एकर असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of stem fly in the mungbean

मुगातील खोड पोखरणार्‍या माशीचे नियंत्रण

  • मुगाच्या पिकाच्या उत्पादनाचे खोड पोखरणार्‍या माशीमुळे होणारे नुकसान 24.24-34.24% या दरम्यान असते.
  • खोड पोखरणारी माशी ही मुगाच्या अंकुरणाच्या वेळी उद्भवणारी गंभीर कीड असून तिला भारतातील मुगावर पडणारी प्रमुख कीड म्हणून ओळखले जाते. ही कीड रोपाला प्रारंभीच्या अवस्थेत हानी पोहोचवते. त्यामुळे रोपे सुकू लागतात. (अंकुरणानंतर 4 आठवड्यांनी)
  • खोड माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 100 मिली  प्रति एकर आणि बिफेन्थ्रिन 10% ईसी @ 300 मिली प्रति एकर या प्रमाणात पानांवर फवारावे.

Share

Management of Stem fly in Pea

खोड माशी या किडीपासुन होणारे नुकसान टाळण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापूर्वी पेरणी करणे टाळावे. प्रादुर्भाव सुरू होताच प्रभावित फांद्या तोडून नष्ट कराव्यात. ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पेरणी करणे उत्तम. पेरणी करताना हेक्टरी 7.5 किलोग्राम फोरेट 10 जी किंवा 25 किलो कार्बोफुरन 3 जी द्यावे. पिकावर तीन वेळा ऑक्सीडमेटन मेथाइल 25 ईसी 750 मिलीलीटर पाण्यात प्रति हेक्टर फवारावे. पहिली फवारणी कोंब फुटल्यानंतर आणि इतर दोन दोन आठवड्यांच्या कालावधीने कराव्यात.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share