Soil selection for sorghum

ज्वारीसाठी मातीची निवड

  • ज्वारीच्या पिकासाठी मातीची जल धारण क्षमता चांगली हवी.
  • ज्वारीचे पीक लोम किंवा रेताड लोम मातीत घेतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer and manure in Sorghum

ज्वारीसाठी उर्वरक आणि खताची आवश्यकता

  • जमिनीच्या मशागतीच्या वेळी शेणखत/ कम्पोस्ट @ 4-5 टन/एकर या प्रमाणात मातीत नीट मिसळावे.
  • ज्वारीसाठी यूरियाची 40 किलोग्रॅम/एकर मात्रा वापरावी. पेरणीपुर्वी अर्धी मात्रा वापरावी. मूलभूत मात्रा देणे शक्य नसल्यास पेरणीच्या वेळी आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी मात्रा द्यावी आणि सिंचन करावे.
  • डीएपीची 45 किग्रॅ प्रति एकर मात्रा वापरावी.
  • एम.ओ.पी. ची 40 – 60 किलोग्रॅम प्रति एकर मात्रा द्यावी.
  • 10 किलोग्रॅम झिंक सल्फेट प्रति एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Advantage of PSB in Sorghum

फॉस्फरस विरघळवणार्‍या जिवाणूंचे (पीएसबी) ज्वारीच्या पिकासाठी महत्त्व

  • हे जिवाणू फॉस्फरसबरोबर मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपरसारखी सूक्ष्म पोषक तत्वेदेखील रोपास उपलब्ध करून देण्यास मदत करतात.
  • ते मुळांचा वेगाने विकास करण्यास मदत करतात. त्यामुळे रोपांना सहजपणे पाणी आणि पोषक तत्वे मिळतात.
  • पीएसबी मॅलिक, सक्सेनिक, फ्यूमरिक, सायट्रिक, टार्टरिक अॅसिड आणि अ‍ॅसिटिक अॅसिड सारखी खास जैविक आम्ले बनवतात. ही आम्ले फॉस्फरसची उपलब्धता वाढवतात.
  • ते रोग आणि शुष्कतेसाठी प्रतिकार क्षमता वाढवतात.
  • त्यांचा वापर केल्याने फॉस्फेटिक उर्वरकांच्या आवश्यकतेत 25 -30% घट होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable climate for sorghum crop

ज्वारीच्या पिकासाठी उपयुक्त हवामान

  • ज्वारी उष्ण हवेतील पीक आहे.
  • परंतु अत्यधिक तापमानाने ज्वारीचे उत्पादन घटते.
  • ज्वारीच्या पिकासाठी अर्ध-शुष्क हवामान उत्तम असते.
  • ज्वारीच्या पिकासाठी 25-35 oC हे अनुकूल तापमान असते.
  • समुद्र सपाटीपासुन जास्त उंचीवरील (1200 मीटरहून अधिक) जमीन या पिकासाठी अनुकूल नसते.
  • ज्वारीचे पीक 300-350 मिली एवढे वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागातही घेता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share