भोपळ्याच्या पिकावरील केवडा (तांबडी भुरी) रोग कसा ओळखावा

भोपळ्यावरील केवडा किंवा तांबडी भुरी रोगाची प्रमुख लक्षणे पुढील प्रमाणे हेत.

  • पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पाण्याने भिजलेले घाव दिसतात.
  • घाव आधी जुन्या पानांवर दिसतात आणि नंतर कोवळ्या पानांवर पसरत जातात.
  • घाव जसजसे पसरतात तसे पिवळे राहतात किंवा सुके आणि तपकिरी होतात.
  • परिणाम झालेल्या वेलींना व्यवस्थित फल धारणा होत नाही.
Share

शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी मार्च – एप्रिल मध्ये पिकांचे हे वाण पेरावेत.

 

अनुक्रमांक पिकाचे नाव महत्त्वाचे प्रकार (कंपनीचे नाव)
. कारले नागेश (हायव्हेज), अमनश्री, यू एस १३१५ (नूनहेमस), आकाश (व्हि एन आर)
. दोडका आरती
. भोपळा कोहिनूर (पाहुजा), व्ही एन आर ११ (व्ही एन आर)
. भेंडी राधिका, विनास प्लस, (गोल्डन), सिंघम (नूनहेमस), शताब्दी (राशी)
. कोथिंबीर सुरभी (नामधारी), एल एस ८०० (पाहुजा)
Share

Suitable Climate for Pumpkin Production

दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान:-

  • ऊष्ण आणि दमट हवामान या पिकासाठी उपयुक्त असते.
  • निम शुष्क आणि थंड वातावरण देखील या पिकासाठी अनुकुल असते.
  • या पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि विकासासाठी रात्रीचे आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे 18-22 C आणि 30-35 C यादरम्यान असावे. 25-30 C तापमानात बीज अंकुरण वेगाने होते.
  • अनुकूल तापमान असताना रोपावरील मादी फुले आणि फळांच्या संख्येत वाढ होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share