मध्य प्रदेशात या तारखेपर्यंत हरभरा, मसूर आणि मोहरीची खरेदी केली जाईल

Know the last date of purchase of wheat on support price in Madhya Pradesh

मध्य प्रदेशात हरभरा, मसूर आणि मोहरीची किमान आधारभूत किंमतीवर खरेदी सध्या सुरू आहे आणि या प्रक्रियेची अंतिम तारीख आता 29 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. पूर्वी कृषी विभागाकडून खरेदी करण्याची शेवटची तारीख 15 जून ठेवण्यात आली होती, ती आता वाढविण्यात आली आहे.

त्याबरोबरच आता एस.एम.एस. पाठवून केवळ शेतकर्‍यांकडूनच खरेदी केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. हे करण्यामागील उद्देश म्हणजे एकाच वेळी स्टोरेजची व्यवस्था करणे हे होय. या विषयावर राज्याचे कृषिमंत्री कमल पटेल यांनी शेतकऱ्यांना आपले पीक घरीच ठेवावे, असे आवाहन केले आहे. नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या उत्पादनांचे प्रत्येक धान्य खरेदी केले जाईल.

उल्लेखनीय आहे की, आतापर्यंत 6 लाख 58 हजार टन हरभरा मध्य प्रदेशात आधार दरावर खरेदी करण्यात आला असून, त्याचे मूल्य म्हणून शेतकऱ्यांना 3,700 कोटी रुपये दिले गेले आहेत. ही खरेदी प्रक्रिया 29 मेपासून सुरू केली गेली होती आणि ती 90 दिवस चालणार आहे.

स्रोत: नई दुनिया

Share

तुम्हाला मोहरी आणि हरभरा पिकाचे नवीन आधारभूत मूल्य माहित आहे का? 

मोहरी आणि हरभरा पिकांच्या काढणीची वेळ आली आहे आणि अशा प्रकारे केंद्र सरकारने या दोन पिकांसाठी आधारभूत किंमत निश्चित केली आहे.  हरभर्‍याची सुधारित आधारभूत किंमत 4875 ठरवण्यात आली आहे तर  मोहरीची आधारभूत किंमत 4425 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

नोंदणीबाबत माहिती

  •       शेतकर्‍यांना नोंदणीसाठी बोटांचे ठसे सादर करावे लागतील.
  •       आधार कार्ड, जनाधार कार्ड / भामाशाह कार्ड, बँक पासबुकची छायाप्रत आणि गिरदावरीच्या पी –35 चा अनुक्रमांक आणि तारीख यासारख्या काही महत्वाच्या कागदपत्रांची छायाचित्र-प्रत शेतकर्‍यांना द्यावी लागेल.
  •       हे लक्षात घ्यावे की फक्त एक शेतकरी एका मोबाइल नंबरसह नोंदणी करू शकतो. नोंदणीसाठी शेतकर्‍याला 31 रुपये द्यावे लागतील.
Share

मोहरीवरील रंगीत भुंग्यांचे नियंत्रण

  • खोल नांगरणीने रंगीत भुंग्यांची अंडी नष्ट होतात
  • हल्ला टाळण्यासाठी लवकर पेरणी करणे आवश्यक असते 
  • हल्ल्याची तीव्रता कमी करण्यासाठी पेरणीनंतर चार आठवडे पिकाला सिंचन करावे 
  • थियामेथोक्साम 25 % डब्ल्यूपी (एव्हिडन्ट/ अरेव्हा) @ 300 ग्रॅ/ एकर फवारावे  किंवा 
  • एसफेट 75% एसपी  (एसमेन) फवारावे किंवा 
  • बायफेनथरीन (क्लीनटॉप/ मार्कर) @ 300 मिली/ एकर फवारावे 
Share

मोहरीवरील रंगीत भुंग्याचे निदान

  • किडा काळ्या रंगाचा असून त्याच्यावर लाल आणि पिवळ्या रेषा असतात
  • हल्ल्यामुळे कोवळी रोपे कोमेजतात आणि मरतात 
  • अळ्या आणि वाढ झालेले किडे पानांमधून आणि कोवळ्या देठांमधून रस शोषतात. त्याने वाढ खुंटते आणि पाने फिकट पिवळी पडतात.  
  • नंतरच्या अवस्थेत किडे शेंगांमधून रस शोषतात. त्याने बियांच्या संख्या आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.
Share

मोहरीसाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

  • मोहरीच्या पिकासाठी फुलोऱ्याची अवस्था महत्वाची असते. 
  • या अवस्थेत फुलांची संख्या वाढवल्याने आणि शेंगांच्या वाढीच्या वेळी हार्मोन्स देण्याने फायदा होतो. 
  • त्यासाठी होमोब्रासिनोलिड 0.04% @ 100 मिली/ एकर 19:19:19 @ 1 किग्रॅ प्रति एकर सह द्यावे. 
Share

मोहरीवरील कातरकिड्याचे रासायनिक नियंत्रण

  • प्रोफेनोफॉस (सेल्क्रोन/ करीना) @ 500 मिली/ एकर फवारावे किंवा
  • 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (बेलिफ/ आलिका) @ 80 ग्रॅ/ एकर फवारावे किंवा
  • इमिडाप्रोक्लिड 30.5% एससी (मीडिया सुपर) @ 100 ग्रॅ/ एकर फवारावे.
Share

मोहरीवरील कातरकिड्याचे (माशीचे) निदान

  • वाढ झालेली माशी केशरी रंगाचे, काळे डोके असलेले असतात. 
  • मोहरीवरील कातरकिड्यांच्या अळ्या पाने आणि शेंगांना भोके पाडून चरतात. कधी कधी त्या पानांचा सर्व हिरवा भाग खाऊन केवळ शिरांची जाळी ठेवतात. 
  • ऑक्टोबर महिन्यात किडे आढळू लागतात आणि त्यांच्या हल्ल्याची सर्वाधिक तीव्रता नोव्हेंबर महिन्यात असते. 
  • हिवाळा सुरु झाल्यावर किडे अचानक गायब होतात. 
Share

Manures and fertilisers for Mustard

मोहरीसाठी खत आणि उर्वरकांचे व्यवस्थापन

शेताच्या मशागतीच्या वेळी एकरी 6-8 टन शेणखत, 25-40 किलो नायट्रोजन, 25 किलो  फॉस्फरस आणि 16 किलो पोटॅश द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of sowing for mustard

मोहरीच्या पेरणीसाठी योग्य काळ

  • मोहरीची पेरणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते.
  • सामान्यता मोहरीच्या पिकासाठी दोन ओळींमधील अंतर 30-45 सेंटीमीटर आणि दोन रोपांमधील अंतर 10-15 सेंटीमीटर राखतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Aphid in Mustard

मोहरीवरील माव्याचे नियंत्रण

  • पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये मावा कीड हानी पोहोचवते.
  • माव्याचे शिशु तसेच वयात आलेले किडे रोपांना हानी पोहोचवतात.
  • हे किडे फळे, पाने आणि फुलांमधील रस शोषतात. त्यामुळे पाने मुडपतात.
  • शेवटी पाने, फुले इत्यादि सुकून गळतात. त्यामुळे उत्पादन घटते.

नियंत्रण:-

  • पीक चक्र अवलंबावे.
  • उर्वरकांची शिफारस केलेली मात्राच वापरावी.
  • जास्त प्रभावित रोपांना उपटून नष्ट करावे.
  • रासायनिक नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारावे.
  • इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल. @ 100 मिली/एकर किंवा थायोमिथोक्सोम 25 डब्लूजी @ 75 ग्रॅम/ एकर किंवा डाईमिथोएट 30% ई.सी.
  • फवारणी संध्याकाळच्या वेळीच करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share