जमीन व बियाण्यांचा उपचार करून उन्हाळी मुगाचे उत्पादन वाढवा.

 

मुगाच्या पिकासाठी शेती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जमीन उपचार आवश्यक आहे. त्याद्वारे, जमिनीत हानीकारक कीटक आणि बुरशी नष्ट होऊ शकते.

भूमीवर उपचार: 6-8 टन चांगल्या कुजलेल्या शेणखतात 4 किलो कंपोस्टिंग बॅक्टेरिया आणि 1 किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी मिसळून एक एकर शेतात पसरवा.

मुगाच्या चांगल्या उत्पादनासाठी बीजोपचार करणे फायदेशीर आहे. हे हानिकारक बुरशी आणि शोषक कीटकांपासून संरक्षण करते.

बियाणे उपचारः  मुगाच्या बियाण्यांमध्ये (1) 2.5 ग्रॅम कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% डीएस किंवा 5-10 ग्रॅम ट्रायकोडर्मा विरिडी/ स्यूडोमोनास फ्लोरेसेंस आणि 5 मिली इमिडाक्लोप्रिड 48 एफएस प्रति किलो बियाण्यासह बीजोपचार करणे.

Share

मूग पिकावरील माव्याचे व्यवस्थापन

  • प्रति एकरी कॉन्फिडॉर (इमिडाक्लोप्रिड) 100 मिली + ब्युव्हेरिआ बॅसिआना (एक प्रकारची मित्र बुरशी)  250 ग्रॅम फवारावे किंवा
  • प्रति एकरी थिआमेथॉक्सॅम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेड सी 100 ग्रॅम फवारावे. किंवा
  • प्रति एकरी अ‍ॅसेटामिप्रिड 20% एस पी 40-80 ग्रॅम फवारावे.
  • रोपावरील किडे हाताने वेचून काढावेत किंवा रोपाचा संसर्ग झालेला भाग काढून टाकावा.
  • पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी किंवा खते देऊ नयेत.
Share

मूग पिकावरील मावा रोग कसा ओळखावा –

  • गंभीर संसर्गामुळे पाने आणि कोंब वळतात, अकाली पिकतात आणि रोपाची वाढ खुंटते.
  • मावा कीटकांनी पाने खाऊन टाकलेल्या गोड उत्सर्जनामुळे रोपांना अनेक बुरशीजन्य रोग होतात.
  • पानांवर बुरशीचे डाग तयार होणे हे या रोगाचे निदर्शक आहे.  
  • उष्ण आणि कोरडे हवामान झाडातील रस शोषणार्‍या मावा कीटकांच्या वाढीसाठी योग्य ठरते.
Share

ग्रामोफोन यांनी मुगाच्या पिकासाठी जमीन तयार करण्यासाठी मूग समृद्धी किट आणले आहे.

  • या किटमध्ये मुगाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक समाविष्ट केलेले आहेत.
  • मुग समृद्धी किट मध्ये अनेक प्रकारचे फायदेशीर जिवाणू असतात.
  • या जिवाणू मध्ये पोटॅश आणि फॉस्फरस जीवाणू, ट्रायकोडर्मा व्हिरीडी, ह्युमिक ऍसिड आणि रायझोबियम जिवाणू हे प्रमुख आहेत.
  • हे किट सर्व प्रकारच्या सूक्ष्म जीवांचे मिश्रण करून बनवले जाते.
  • या किटचे एकूण वजन सहा किलो आहे ते एक एकर जमिनीसाठी उपयुक्त आहे.
Share

How to Take care of insect pests & diseases at bud initiation stage of mungbean

मुगाचा फुलोरा येण्याच्या अवस्थेत कीड आणि रोगांपासून बचाव

    • मुगाच्या पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी कीड आणि रोगांचे नियंत्रण अत्यावश्यक असते.
    • कीड आणि रोगांमुळे मुगाच्या उत्पादनाची सुमारे 70% हानी होऊ शकते.
    • उन्हाळ्यात फुलोरा येण्याच्या आणि फलधारणेच्या वेळी फळ पोखरणारी अळी, तंबाखू अळी इत्यादि किडीमुळे  नुकसान होते.
    • शेंगा येणार्‍या इतर पिकांप्रमाणे मुगाचे पीक देखील बुरशी, जिवाणू आणि विषाणूमुळे होणार्‍या रोगांबाबत अतिसंवेदनशील असते. पाने, खोड आणि मुळांवर मर रोग, पिवळेपणा आणि मुळांचा कुजवा पिकाच्या वाढीदरम्यान आढळून येतात.
    • किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफोस 36% एसएल @ 300 मिली/ एकर, इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी @ 100 ग्रॅम/ एकर (फळावरील अळीसाठी) आणि फ्लुबेंडामाइड  20% डब्लू जी 100 मिली/ एकर किंवा इंडोक्साकार्ब 14.5 % एस सी @ 160-200 मिली/ एकर (तंबाखू अळीसाठी) वापरता येते.
    • रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम/ एकर (मर रोगासाठी) आणि थायोफनेट मिथाइल 70% डब्ल्यू पी @ 250-300 ग्रॅम प्रति एकर (मातीजन्य रोगांसाठी) वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of stem fly in the mungbean

मुगातील खोड पोखरणार्‍या माशीचे नियंत्रण

  • मुगाच्या पिकाच्या उत्पादनाचे खोड पोखरणार्‍या माशीमुळे होणारे नुकसान 24.24-34.24% या दरम्यान असते.
  • खोड पोखरणारी माशी ही मुगाच्या अंकुरणाच्या वेळी उद्भवणारी गंभीर कीड असून तिला भारतातील मुगावर पडणारी प्रमुख कीड म्हणून ओळखले जाते. ही कीड रोपाला प्रारंभीच्या अवस्थेत हानी पोहोचवते. त्यामुळे रोपे सुकू लागतात. (अंकुरणानंतर 4 आठवड्यांनी)
  • खोड माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 100 मिली  प्रति एकर आणि बिफेन्थ्रिन 10% ईसी @ 300 मिली प्रति एकर या प्रमाणात पानांवर फवारावे.

Share

Seed rate in green gram (Moong)

मुगाच्या बियाण्याचे प्रमाण

  • खरीपाच्या हंगामासाठी 8-9 किग्रॅ/ एकर या प्रमाणात बियाणे वापरावे तर उन्हाळी हंगामासाठी 12-15 किग्रॅ/ एकर या प्रमाणात बियाणे वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share