मध्य प्रदेशातील बर्याच भागांत अचानक बदललेल्या हवामानामुळे पाऊस सुरू झाला. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे हा हंगामी बदल दिसून येत आहे. यामुळेच मध्य प्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये भोपाळ, रायसेन, सीहोर, सागर येथे पाऊस पडत असून रायसेन आणि नरसिंगपूरमध्येही गारपिट झाल्याची नोंद झाली तसेच सिवनी जिल्ह्यातही बर्याच ठिकाणी गारपिटीची नोंद झाली आहे.
येत्या दोन दिवसांत मध्य प्रदेशातील 18 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामानाचा अंदाज पाहता, शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची आणि त्यांच्या स्वत:च्या स्तरावर यासंबंधी व्यवस्था करण्याची गरज आहे.
मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात गारपीटीची शक्यता आहे?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गारपीट होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये शहडोल आणि होशंगाबाद विभाग तसेच रीवा, सतना, दमोह, सागर, छिंदवाडा, सिवनी, रायसेन, सीहोर, दतिया, भोपाळ, गुना आणि भिंड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
Share