Management of Wilt in Pea

मटारमधील मर रोगाचे नियंत्रण:-

  • किकसित झालेल्या पल्लव आणि पानांच्या कडा कोपर्‍यातून मूडपणे आणि पाने वेडीवाकडी होणे हे या रोगाचे पहिले आणि मुख्य लक्षण आहे.
  • रोपांचा वरील भाग पिवळा पडतो, कळ्यांची वाढ थांबते, खोड आणि वरील बाजूची पाने जास्त कडक होतात, मुळे ठिसुळ होतात आणि खालील बाजूची पाने पिवळी पडून झडतात.
  • पूर्ण वेल कोमेजतो आणि खोड खालील बाजूने आकसते.

नियंत्रण:-

  • कार्बोक्सीन 37.5 % + थायरम 37.5 % @ 3 ग्रॅम/किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा विरिडी @  5 ग्रॅम /किलो बियाणे वापरुन पेरणीपुर्वी बीजसंस्करण करावे आणि जेथे संक्रमण अधिक आहे त्या भागात पेरणी करू नये.
  • 3 वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • या रोगाचे आश्रयस्थान असलेले तण नष्ट करावे.
  • माइकोरायझा @ 4 किलो प्रति एकर @ 15 दिवस फवारावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी थायोफिनेट मिथाईल 75% @ 300 ग्रॅम/एकर फवारावे.
  • शेंगा लागताना प्रोपिकोनाझोल 25% @ 125 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed treatment of Potato

बटाटा हे कंदाभ पीक असून त्याला बियाणे आणि मातीतून पसरणार्‍या वेगवेगळ्या जिवाणूजन्य रोगांची लागण होते. त्यामुळे बटाट्याचे बीज संस्करण करणे अत्यंत महत्वाचे ठरते. बटाट्याचे बीज संस्करण करण्यासाठी कार्बोक्सीन 37. 5 % + थायरम 37. 5 % @ 200 ग्रॅम/एकर किंवा कार्बेन्डाजिम 12 % + मेंकोजेब 63% WP @ 200 ग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share