Major Diseases and Their Control Measures of Wheat

तांबेरा (गेरवा) हा गव्हाच्या पिकावरील मुख्य रोग असून गव्हामध्ये पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा), पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा),काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) यासह चार प्रकारच्या तांबेर्‍याचा संसर्ग आढळतो.

लक्षणे –

 

  • पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा):- पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा) हा रोग प्यूसीनिया स्ट्रिफॉर्मिस बुरशीमुळे होतो.नारिंगी-पिवळ्या रंगाच्या बीजामुळे तो गव्हावरील इतर प्रकारच्या तांबेर्‍याहून लगेच वेगळा ओळखता येतो. या  बीजातून एकमेकांना चिकटलेल्या सूक्ष्म पुटकुळया निर्माण होतात आणि पानांच्या शिरांना समांतर असे त्यांचे चट्टे तयार होतात. बीजे पानांच्या वरील बाजूस, पर्णआवरणावर, कुसळांवर आणि तुसांमध्ये आढळतात. 

 

  • पोषक परिस्थिति:- थंड आणि दमट हवामानात पिकामध्ये पिवळा तांबेरा (पट्टेरी तांबेरा) रोगाची लागण होते. संसर्ग होण्यासाठी पानांवर ओल असणे आणि 10-15°C इष्टतम तापमान आवश्यक असते. लागण झाल्यापासून 10-14 दिवसात पुटकुळया तयार होतात. रोगामुळे उत्पादनात 25% पर्यंत घट होऊ शकते. 

 

  • पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा):- पानांचा तांबेरा (गेरवा तांबेरा) प्यूसिनिया ट्राइटिसिनिया बुरशीमुळे होतो. हा रोग राय धान्य आणि ट्रिटिकेल या धान्यांच्या पिकात देखील होतो. पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) लालसर-नारिंगी रंगाची बीजे निर्माण होतात आणि त्यापासून लहान 1.5 मिमी आकाराच्या, वर्तुळाकार ते अंडाकार आकाराच्या पुटकुळया तयार होतात. त्या पानांच्या वरील बाजूला असतात. पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या फक्त वरील बाजूस असतात तर पिवळ्या तांबेर्‍यामुळे  (पट्टेरी तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या दोन्ही बाजूला असतात.  

 

  • पोषक परिस्थिति:- पुटकुळया येण्यासाठी 15 ते 20º C तापमान आणि दव/ पाऊस/ सिंचनामुळे पानांवर ओल असणे आवश्यक असते. संसर्ग झाल्यावर 10-14 दिवसांनी उठणार्‍या पुटकुळया हे रोगाचे आढळून येणारे पहिले लक्षण असते. कापणींनंतर उन्हाळ्यात पुन्हा उगवणार्‍या गव्हाच्या रोपांमुळे रोगाची साथ चालू राहत असल्याने अशी रोपे काढून  पानांच्या तांबेर्‍याचे (गेरवा तांबेरा) नियंत्रण करणे किंवा त्याच्या साथीला काही काळ रोखणे शक्य होते. 

 

  • Black Rust (Stem Rust):– काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोग पुसिनिया ग्रॅमिनिस बुरशीमुळे होतो. गव्हाशिवाय बार्ली राय आणि  ट्रिटिकेल या धान्यांच्या पिकात देखील या रोगाची लागण होते. काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोगामध्ये लालसर-करड्या रंगाच्या, लंबगोल पुटकुळ्या किंवा चट्टे खोड आणि पानांवर उमटतात. काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोगाच्या पुटकुळ्या पानांच्या दोन्ही बाजूला असतात तर पानांच्या तांबेर्‍यामुळे (गेरवा तांबेरा) आलेल्या पुटकुळया पानांच्या फक्त वरील बाजूस असतात. पुटकुळ्या फुटून बाहेर पडलेला भुरा वारा आणि अन्य वाहक इतर रोपांपर्यंत पोहोचवतात आणि रोगाचा प्रसार वाढतो.

 

  • पोषक परिस्थिति:- काळा गेरवा (खोडाचा तांबेरा) रोग इतर प्रकारच्या तांबेऱ्याहुन अधिक म्हणजे 18-30°C तापमान असताना होतो. संसर्ग होण्यासाठी 15 ते 20º C तापमान आणि दव/ पाऊस/ सिंचनामुळे पानांवर ओल असणे आवश्यक असते आणि सुमारे सहा तासात पूर्ण रोपाला लागण होते. संसर्ग झाल्यानंतर 10-20 दिवसांनी पुटकुळया आढळून येतात. 

नियंत्रण:-

  • कापणींनंतर उन्हाळ्यात पुन्हा उगवणारी गव्हाची रोपे नष्ट करा. 
  • पिवळे डाग पडल्यास पीकपालट करणे महत्वाचे असते. 
  • रोग प्रतिकारक वाण वापरण्याने कमी खर्चात आणि पर्यावरण पोषक पद्धतीने रोगाचे नियंत्रण करता येते. 
  • वाढीच्या काळात पिकाचे बारकाईने निरीक्षण करणे रोगाचे तातडीने निदान होण्यासाठी आवश्यक असते. 
  • एकाच घटकाचा समावेश असलेल्या बुरशीनाशकांचा पुन्हापुन्हा वापर टाळा. 
  • कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराईड 45% डब्ल्युपी 320 ग्रॅम/ एकर या प्रमाणात किंवा प्रोपिकोनाझोल 25% ईसी 240 मिलि/ एकर या प्रमाणात फवारा. 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Powdery Mildew of Watermelon

कलिंगडामधील भुरी (पावडर मिल्ड्यु) रोग:-

  • पानांवर पांढरे किंवा धुरकट रंगाचे डाग उमटतात आणि ते वाढून पांढर्‍या रंगाची भूकटी बनते.
  • दर 15 दिवसांनी हेक्झाकोनाझोल 5% SC 300 मिली. प्रति एकर किंवा थायोफिनेट मिथाईल 400 ग्रॅम प्रति एकरचे मिश्रण फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Bacterial leaf spot disease in Tomato

या रोगामुळे उत्पादनात प्रचंड घट होते. त्याचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट I.P. 90% w/w, टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10% w/w @ 2 ग्रॅम/ 15 लीटर पाणी या प्रमाणात किंवा कासुगामायसिन 3% एस.एल. @ 40 ml / 15 लीटर पाणी + कॉपर ऑक्सी क्लोराइड 50% WP @ 40 ग्रॅम/ 15 लीटर पाणी रोगाची सुरुवातीची लक्षणे आढळून येताच फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share