Control of leaf miner in cowpea

चवळीच्या पिकातील पाने पोखरणार्‍या किडीचे (लीफ माईनर) नियंत्रण

  • या किडीच्या अळ्या पानांना आतील बाजूने वेड्यावाकड्या आकारात खातात.
  • किडीचा हल्ला झाल्यावर पानांवर पांढर्‍या रेषा उमटतात.
  • किडीमुळे रोपांच्या फलनक्षमता आणि फुले येण्याच्या क्षमतेवर विपरित  परिणाम होतो.
  • डेल्टामेथ्रिन 2.8% ईसी @ 200 मिली/एकर किंवा ट्रायझोफॉस 40% ईसी @ 350-500 मिली/ एकर अशा जैविक कीटकनशकांचे पाण्यात मिश्रण करून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Climate for cowpea cultivation

चवळीसाठी सुयोग्य हवामान

  • चवळी हे उष्ण हवामानात येणारे पीक आहे.
  • दाणे आणि भाजी या दोन्ही प्रकारच्या चवळीचे पीक अधिक तापमान असलेल्या, कोरड्या हवामानात आणि निकृष्ट प्रतीच्या जमिनीत देखील घेता येते.
  • वेगवेगळ्या जातींवर पाऊस आणि तापमानाचा वेगळा परिणाम होतो. त्यामुळे वाणाची निवड हंगामानुसार आणि हवामानानुसार करावी.
  • चवळीचे पीक 21 oC ते 35 oC तापमान असताना उत्तम येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Ideal soil for cowpea cultivation

चवळीसाठी आदर्श माती

  • पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या सर्व प्रकारच्या मातीत चवळीची शेती करता येते पण या पिकासाठी लोम माती सर्वोत्तम असते.
  • लवणीय आणि क्षारीय जमीन चवळी किंवा चवळईच्या शेतीस उपयुक्त नसते.
  • वेलांच्या चांगल्या विकासासाठी मातीचा पी.एच स्तर 5.5-6.0 असावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of cowpea pod borer

चवळीच्या शेंगा पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण

  • या अळ्या शेंगात भोक पाडून आतील बिया खातात.
  • फुले आणि शेंगा नसल्यास त्या पाने खातात.
  • खोल नांगरणी करून जमिनीतील किडीचा कोश अवस्थेत नायनाट करता येतो. त्याशिवाय पीक चक्र अवलंबून किडीचे नियंत्रण करणे शक्य असते.
  • प्रतिरोधक/सहनशील वाणे पेरावीत.
  • 3 फुट लांब दांड्या हेक्टरी 10 या प्रमाणात पक्षांना बसण्यासाठी रोवाव्यात.
  • क्लोरपायरीफोस 20% ईसी 450 मिली/एकर किंवा इंडोक्साकार्ब 14.5% एससी @ 160-200 मिली/एकरचे पाण्यात मिश्रण बनवून फवारावे.
  • इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी @ 100 ग्रॅम/ एकर चे पाण्यात मिश्रण बनवून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of sowing of Cowpea

चवळीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • बहुतेक भागात चवळीची पेरणी उन्हाळा आणि पावसाळ्यात केली जाते.
  • खरीपाच्या पिकासाठी पोल टाईप वाणे जून- जुलैमध्ये पेरतात तर इतर वाणांची पेरणी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये केली जाते.
  • उन्हाळी पिकाची पेरणी फेब्रुवारी – मार्च मध्ये करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Leaf Miner in Cowpea

चवळीवरील पाने पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण

चवळीवरील पाने पोखरणारी अळी :-

कशी ओळखावी:-

  • वयात आलेल्या अळया लहान आणि नाजुक असतात. त्यांचा आकार इंचाचा आठवा भाग एवढा असतो.
  • त्या काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या असतात.
  • अंडी गोल, सूक्ष्म आणि पिवळट पांढरी असतात.
  • लार्वा पांढर्‍या रंगाचे असून डोक्याच्या बाजूला पिवळे असतात. पूर्ण विकसित झाल्यावर त्यांचा आकार एका इंचाच्या सहाव्या भागाएवढा असतो.

हानी:-

  • मादी आपल्या टोकदार प्रजनन अंगाद्वारे पानांच्या उतींमध्ये प्रवेश करून 300-400 अंडी देते.
  • अंड्यातून निघालेले लार्वा माईन्स पानांच्या मिसोफिल उती वाकड्या तिकड्या आकारात खातात.
  • पाने पोखरणार्‍या अळीचा हल्ला होताच पानांवर चमकदार पांढर्‍या रेषा उमटतात.
  • पूर्ण वाढ झालेल्या अळया पानात भोके पाडून कोशिका रस शोषतात.
  • कीडग्रस्त रोपांच्या फलन आणि फुलन क्षमतेवर विपरीत प्रभाव पडतो.

नियंत्रण:-

  • डायक्लोरोवास 40 मिली. + नीम तेल 50 मिली. प्रति पम्प फवारावे.
  • डायमिथोएट 40 मिली. किंवा कारटाप हाईड्रो क्लोराईड 75% SG 20 ग्राम/ प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share