Control of Collar rot in chilli

मिरचीमधील बुड कुज रोगाचे नियंत्रण

  • रोगग्रस्त रोपांचे अवशेष नष्ट करावे.
  • पाण्याच्या निचार्‍याची व्यवस्था करावी आणि पीक चक्र अवलंबावे.
  • उंच जागी नर्सरी बनवावी.
  • कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 64% @ 3 ग्रॅम/ किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • कार्बेन्डाजिम 3 ग्रॅम किंवा मेटालेक्ज़िल8% + मॅन्कोझेब 64% @ 500 ग्रॅम/ एकर या प्रमाणात मिश्रण बनवून 10 दिवसांच्या अंतराने दोन वेळा ड्रेंचिंग करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Symptoms of Collar rot in chilli

मिरचीमधील बुड कुज रोगाची लक्षणे

  • बुरशी जमिनीजवळ खांबाच्या आधारे उतींचा क्षय करून रोप सुकवते.
  • रोपात विकृति निर्माण होणे याचे मुख्य लक्षण आहे.
  • उती सडल्याने रोप मरते.
  • खोडाच्या जमिनीजवळच्या भागात मायसेलिया जमते.
  • रोपाच्या जवळ पाणी तुंबल्याने किंवा रोपाची यांत्रिक हानी झाल्यास या रोगाची लागण होण्याची शक्यता वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to increase flowering and fruiting in chilli crop

मिरचीच्या पिकात बहर आणि फलन वाढवणे

  • कोणत्याही पिकात बहर येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • मिरचीच्या पिकात फुले गळणे ही समस्या नेहमी येते.
  • मिरचीच्या उत्पादनात फुलांची संख्या खूप महत्वपूर्ण असते.
  • खालीलपैकी काही उत्पादने वापरुन मिरचीचा फुलोरा झडणे रोखून फुलांची संख्या वाढवता येते. परिणामी उत्पादन वाढते.
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे किंवा होशी नावाचे उत्पादन 250 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली/ एकर या प्रमाणात वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्त्वे 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Mites in Chilli

मिरचीच्या पिकातील कोळ्यांचे नियंत्रण : –

  • कोळीसारखे लहान कीटक मोठ्या संख्येने आढळतात आणि पानांच्या खाली बारीक जाळीने झाकलेले असतात.
  • अर्भक आणि प्रौढ, पानांमधून रस शोषून घेतात.प्रभावित पाने पानांच्या काठाच्या बाजूने वळून उलट्या नौकाचा आकार घेतात.
  • पानांचे देठ वाढलेले आणि छोटी पाने दातेरी होऊन गुच्छदार दिसतात.
  • पाने गडद राखाडी रंगाचे होतात, पानांचे आवरण कमी होते आणि फूल येणं थांबतात.
  • गंभीर परिस्थिती मध्ये फळाची भिंत कठोर होते आणि फळावर पांढर्‍या पट्टे दिसतात.

नियंत्रण

  • प्रति लिटर पाण्या बरोबर सल्फर ८०% डब्ल्यूपी सारखे वरूथिनाशक @ ३ ग्राम, अळ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवतात.
  • ७ दिवसांच्या अंतराने दोनदा प्रोपरगईट ५७% ईसी @ ४०० मिली / एकर फवारणी केल्यास प्रारंभिक अवस्थेत कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
  • गंभीरपणे बाधित झाडाचे भाग गोळा करून जाळण्यामुळे अळीची पुढील वृद्धी नियंत्रित होते.
  • कीटकांची संख्या नियंत्रित करण्यासाठी योग्य सिंचन व स्वच्छ लागवड करणे आवश्यक आहे.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

Aphids Attack in Chilli Crop

मिरची पिकावरील मावा चा हल्ला

  • अर्भक आणि प्रौढ हे दोन्ही नरम, नाशपातीचे आकाराचे, काळ्या रंगाचे आहेत.
  • कोमल अंकुर, पाने आणि पानांच्या खालच्या पृष्ठभागावर दिसतात.
  • रस शोषून घेतात आणि झाडांची जोम कमी करतात.
  • गोड पदार्थ उत्पन्न करतात जे मुंग्यांना आकर्षित करतात आणि काळी मूस विकसित होते

नियंत्रण: – मावाच्या लोकसंख्येचा शेवट होईपर्यंत १५-२० दिवसांच्या अंतराने खालील कीटकनाशकांसह पिकाची फवारणी करावी.

  • प्रोफेनोफॉस 50% ईसी @ 50 मिली / पंप.
  • एसीटामिप्रिड 20 एसपी @ 10 ग्राम/ पंप.
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 7 मिली / पंप.
  • फिप्रोनिल 5% एससी @ 40 मिली / पंप.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा.

Share

Management of Fruit borer in chilli

  • प्रौढ कीटकांच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळा @ ३-४/एकर वापरा.
  • प्रथम फवारणी प्रोफेनोफॉस ५०% ई.सी. @ ३०० मिली / एकर + क्लोरपायरीफॉस २०% ईसी @ ५०० मिली / एकर.
  • दुसरी फवारणी प्रोफेनोफॉस 50% ईसी @ ३०० मिली / एकर + इमामाटिन बेंझोएट ५% एसजी @ ८०-१०० ग्राम/ एकर किंवा प्रोफेनोफोस 300 मिली / एकर + फ्लॉनीकायमिड ५०% डब्ल्यूजी @ १०० ग्राम/ एकर.
  • तिसरी फवारणी इमाकॅक्टिन बेंझोएट 5% एसजी @ 80-100 ग्राम/ एकर + फेनप्रोपाथ्रीन 10% ईसी @ 250-300 मिली / एकर.
  • चौथी फवारणी क्लोरानट्रानिलीप्रोल 9.3% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 4.6% झेडसी @ 100 मिली / एकर किंवा थायोडिकार्ब 75% डब्ल्यूपी @ 250 ग्राम/ एकर.
  • जैविक उपचार म्हणून 1 लिटर किंवा कि.ग्रा. / एकर ब्यूव्हेरिया बॅसियानाची फवारणी करा.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

Symptoms of damage “Chilli Fruit Borer”

  • पुष्पवृंतच्या पायथ्याशी गोलाकार छिद्र दिसतो. अकाली फुले व शेंगा पडणे. फळ पांढर्‍या रंगात बदलते.
  • मुख्यतः पोखर अळ्या फळांमध्ये वाढतात.
  • विकासरूप अळ्या तरूण शेंगा आणि फुलांच्या कळ्यावर गोलाकार भोक करुन खातात. अळ्या सहसा पिकलेले फळांमध्ये बियाणे खातात.
  • खाताना अळी च डोक शेंगाच्या आत असतो आणि उर्वरित शरीर फळाच्या बाहेर असतो.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

Fertigation for good quality fruit of chilli at the time of 45-80 days after transplanting

  • पोटाश मोबिलिझिंग बॅक्टेरिया आणि फॉस्फरस विरघळणारे बॅक्टेरिया @ 250 मिली / एकर.
  • 13:00:45 – दररोज १ किलो प्रति एकर.
  • 00:52:3 – दररोज १.२ किलो प्रति एकर.
  • युरिया – दररोज ५०० ग्राम/एकर
  • सल्फर 90% डब्ल्यूडीजी – दररोज २०० ग्राम/एकर
  • कॅल्शियम – दररोज 5 किलो/एकर (फक्त एकदाच).

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा.

Share

Problems and solutions of sucking pest in chilli:-

मिरचीमधील रस शोषणार्‍या किडीची समस्या आणि त्यावर उपाय

मिरचीच्या पिकात मावा, तुडतुडे आणि तेलकिड्यासारख्या रस शोषणार्‍या किडीचा प्रादुर्भाव ही मुख्य समस्या असते. ही किड मिरचीच्या पिकातील हिरव्या भागातून रस शोषून हानी करते. त्यामुळे पाने मुडपतात आणि गळून जातात. रस शोषक किडीच्या संक्रमणाने बुरशी आणि विषाणूजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे किडीचे वेळेत नियंत्रण करणे आवश्यक आहे:-

नियंत्रण:

प्रोफेनोफॉस 50% EC @ 400 मिली/ एकर किंवा

अ‍ॅसीफेट 75% SP @ 250 ग्रॅम/ एकर किंवा

लॅम्ब्डा सायहेलोथ्रिन 4.9% CS @ 200-250 मिली/ एकर किंवा

फिप्रोनिल 5% SC @ 300-350 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे.

अधिक माहितीसाठी आमच्या 1800-315-7566 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Transplanting Precautions in Chilli

मिरचीचे पुनर्रोपण करताना बाळगण्याची सावधगिरी

  • मिरचीची लागवड जुलै – सप्टेंबर या काळात केली जाते.
  • ऑगस्ट महिना मिरचीच्या लागवडीस सर्वोत्तम असतो. त्याखालोखाल सप्टेंबर महिना उत्तम असतो.
  • पुनर्रोपणापूर्वी 5-7 दिवस टेबुकोनाझोल वापरुन फवारणी किंवा ड्रेंचिंग केल्याने आर्द्र गलनाची समस्या येत नाही. पुनर्रोपणापूर्वी रोपांच्या मुळांना मायकोराइजाच्या द्रावणात (100 ग्रॅम/ 10 लीटर पाणी) बुडवावे.
  • रोपातील अंतर (दोन ओळीत X दोन रोपात – 3.5-5 फुट X 1-1.5 फुट अनुक्रमे) योग्य प्रमाणात ठेवावे.
  • शेतात किडीचा तीव्र उपद्रव झाल्यास कार्बोफुरॉन 3G @ 8 किलो/ एकर या प्रमाणात भुरभुरावे. रोपे सुकत असल्यास ट्रायकोडर्मा 4 किलो/ एकर या प्रमाणात भुरभुरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share