हरबर्‍याच्या पिकातील तणाचे नियंत्रण

Weed management is necessary in gram crop
  • हरभरा पिकामध्ये तणांचे अनेक प्रकार जसे की, बथुआ, खरतुआ, मोरवा, प्याजी, मोथा, दूब इत्यादिमुळे तण वाढतात. 

  • हे तण पोषक, ओलावा, जागा आणि प्रकाश यासाठी पिकांच्या झाडांशी स्पर्धा करून उत्पादनावर परिणाम करतात, याशिवाय तणांमुळे पिकावर अनेक रोग व कीडही येतात ज्यामुळे बियाण्याच्या गुणवत्तेवरही मोठा परिणाम होतो.

  • तणांमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी वेळेचे नियंत्रण करणे खूप महत्वाचे आहे. हरभरा पिकाला दोनवेळा खुरपणी करणे आवश्यक आहे. पहिली खुरपणी पेरणीनंतर 20-25 दिवसांनी आणि दुसरी 50-55 दिवसांनी करावी.

  • जर कामगार उपलब्ध नसतील तर, पेरणीनंतर 1-3 दिवसांनी पेंडीमेथलीन 38.7% ईसी 700 मिली प्रति एकर दराने शेतात समान रीतीने फवारणी करावी, तसेच पेरणीनंतर 20-25 दिवसांनी एक खुरपणी करावी. अशा प्रकारे हरभरा पिकातील तणांमुळे होणारे नुकसान टाळता येते.

Share

How to flower promotion in chickpea

  • पुढील उत्पादने वापरून आपण फुलोरा वाढवून उत्पादनात वाढ करू शकतो: 
  • होमोब्रासिनोलिड 0.04% डब्ल्यू/ डब्ल्यू 100 मिली/ एकर फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 200-250 मिली/ एकर वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्वे, विशेषतः बोरॉन 200 ग्रॅ/ एकर द्यावीत.
  • जिब्रेलिक अॅसिड 2 ग्रॅ/ एकर फवारावे.

Share

Seed Treatment of Chickpea (Gram)

हरबऱ्याचे बीजसंस्करण

  • मूळ कूज, खोड कूज, बूड कूज अशा बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी हरबऱ्याची पेरणी करण्यापूर्वी कार्बोक्सिन5% + थायरम 37.5% किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरून बीजसंस्करण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Storage technique for gram

हरबर्‍याच्या साठवणुकीचे तंत्र

  • सुमारे 13 ते 15 टक्के आर्द्रता असताना पिकाची कापणी केल्याने हरबर्‍याच्या दाण्यांचे प्रमाण घटते.
  • साठवणुक करताना योग्य काळजी घेतल्याने हरबर्‍याच्या गुणवत्तेशी संबंधित घटकांवर जसे रंग, बाह्य रूप इ. परिणाम होतो.
  • उत्पादनाच्या साठवणुकीपूर्वी त्याची सफाई करावी.
  • साठवण केलेल्या धान्याचे वेळोवेळी निरिक्षण करावे.
  • साठवणुकीच्या वेळी धान्यातील आर्द्रतेकडे खास लक्ष द्यावे. आर्द्रता कमी असल्यास दाणे तुटू शकतात.
  • वातावरण अनुकूल नसल्यास धान्य अधिक तुटते.
  • निरोगी दाण्यांची बाजारातील किंमत जास्त असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Gram harvesting

हरबर्‍याची कापणी

  • अधिकांश शेंगा पिवळ्या झाल्यावर हरबर्‍याची कापणी करावी.
  • कापणीच्या वेळी हरबर्‍यात सुमारे 15 टक्के आर्द्रता असावी.
  • झाड वाळते आणि त्याची पाने लालसर राखाडी रंगाची होऊन गळू लागतात तेव्हा पीक कापणीस तयार झालेले असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of pod borer in Gram(Chickpea)

 

हरबर्‍यातील घाटे पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण:-

घाटे पोखरणारी अळी ही कुप्रसिद्ध कीड पिकाला भारी नुकसान पोहोचवते. घाटे पोखरणार्‍या अळीमुळे उत्पादनात 21% हानी होते. या किडीमुळे हरबर्‍याचे सुमारे 50 ते 60% नुकसान होते. हरबर्‍याशिवाय ही कीड तूर, मटार, सूर्यफूल, कापूस, मिरची, ज्वारी, शेंगदाणा, टोमॅटो आणि इतर पिकांनाही ग्रासते. ही डाळी आणि गळिताच्या धान्यावरील विनाशकारी कीड आहे.

संक्रमण:-

किडीची सुरुवात सहसा अंकुरणांनंतर एका पंधरवड्याने होते. फुलोरा येण्याच्या वेळी ढगाळ आणि दमट हवामानात तिचे स्वरूप गंभीर होते. मादी अनेक लहान पांढरी अंडी घालते. 3-4 दिवसात त्यातून अळ्या निघतात. त्या कोवळा पाला खातात आणि त्यानंतर घाट्यांवर हल्ला करतात. एक पूर्ण विकसित अळी सुमारे 34 मिमी लांब, हिरव्या ते राखाडी रंगाची असते. ती मातीत जाऊन कोश बनवते. या किडीचे जीवनचक्र सुमारे 30-45 दिवसात पूर्ण होते. एका वर्षात किडीच्या आठ पिढ्या होतात.

नियंत्रण:-

उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी. त्यामुळे जमिनीत लपलेले किडे नैसर्गिक शत्रू खातील.  0.5%  जिगरी आणि 0.1% बोरिक अॅसिडबरोबर HaNVP 100 LE प्रति एकर अंडी घालण्याच्या वेळी फवारावे आणि 15-20 दिवसांनी पुन्हा फवारणी करावी. रसायनांच्या वापरात 2.00 मिलीलीटर प्रोफेनोफोस 50 ईसी प्रति लीटर पाण्यात अंडीनाशक म्हणून फवारावे. हेक्टरी 4-5 फेरोमेन ट्रॅप वापरावेत. सुरुवातीच्या अवस्थेत निंबोणीच्या फळांचे सत्व 5% फवारावे. हल्ला तीव्र असल्यास इंडोक्साकार्ब 14.5% SC 0.5 मिली किंवा स्पिनोसेड 45% SC 0.1 मिली किंवा 2.5 मिली क्लोरोपाईरीफास 20 EC प्रति ली. पाण्यातून फवारावे.  पक्षी बसण्यासाठी 4-5 जागा बनावाव्यात आणि पिकाच्या सर्व बाजूंनी भेंडी आणि झेंडूचे सुरक्षा पीक लावावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Healthy and Excellent Crop of Chickpea

हरबर्‍याचे निरोगी आणि उत्तम पीक

शेतकर्‍याचे नाव:- कल्याण पटेल

गाव+ तहसील:- देपालपुर

जिल्हा:- इंदौर

राज्य:- मध्यप्रदेश

कल्याण जी यांनी 10 एकर क्षेत्रात हरबरा लावला असून त्यात त्यांनी ग्रामोफोनच्या सूचनेनुसार प्रोपिकोनाजोल 25% EC आणि त्याचबरोबर एका विश्वसनीय कम्पनीच्या ज़ाईमची फवारणी केली. आता हरबरा उत्तम असून कोणताही रोग नाही आणि चांगला फुलोरा आहे.

Share

Maximum Control of Root rot in Gram(Chickpea)

हरबर्‍यातील मूळ कुज रोगाचे प्रभावी नियंत्रण

शेतकर्‍याचे नाव:- हरिओम बहादुर सिंह

गाव:- लिम्बोदापार

तहसील आणि जिल्हा:- देपालपुर और इंदौर

शेतकरी बंधु हरिओम जी यांनी हरबर्‍यातील मूळ कुज आणि पांढर्‍या बुरशीच्या समस्येसाठी प्रोपीकोनाज़ोल 25% EC ची फवारणी केली. त्यामुळे हरबर्‍यावरील रोगाचा प्रभाव कमी झाला आहे आणि नवीन फुटवे देखील फुटू लागले आहेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Better flowering and growth in Gram(Chickpea)

हरबर्‍याचा चांगला फुलोरा आणि विकास

शेतकर्‍याचे नाव:- ओमप्रकाश पाटीदार

गाव:- पनवाड़ी

तहसील आणि जिल्हा:- शाजापुर

शेतकरी बंधु ओम प्रकाश जी यांनी 4 एकर क्षेत्रात हरबरा लावला आहे. त्यावर त्यांनी ह्यूमिक अॅसिड 15 ग्राम प्रति पम्प फवारले. त्यामुळे फुलांची संख्या वाढली आणि रोपांची वाढ देखील अधिक झाली. हयुमिक अॅसिड पाण्यात पूर्णपणे विरघळते. त्याच्यामुळे रोपाला अधिक व्हिटामिन मिळतात आणि फॉस्फरसची उपलब्धता वाढते. ते कोशिकांच्या विभाजनाला गती देते आणि रोपाचा वाढीला प्रोत्साहन देते. ते मुळांच्या विकासाला आणि शुष्क पदार्थांच्या वाढीलाही पोषक असते. त्याच्या उपयोगाने पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषली आणि वापरली जातात. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer application for Chickpea

हरबर्‍यासाठी खताबाबत माहिती

हरबर्‍याचे पीक दळदार असल्याने त्याला कमी नायट्रोजन लागतो. हरबर्‍याच्या रोपांच्या मुळात ग्रन्थि असतात. ग्रन्थितील जीवाणु वातावरणातील नायट्रोजनचे मुळात स्थिरीकरण करून रोपाला लागणारा नायट्रोजन मिळवून देतात. परंतु सुरूवातीला रोपाच्या मुळातील ग्रंन्थिचा पूर्ण विकास न झाल्याने रोपे जमिनीतून नायट्रोजन मिळवतात. त्यामुळे नायट्रोजनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हेक्टरी 20 कि.ग्रॅ. नायट्रोजनची आवश्यकता असते. त्याबरोबर 40 कि.ग्रॅ. फॉस्फरस प्रति हेक्टर द्यावा. नायट्रोजनची मात्रा यूरिया किंवा डाई अमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि शेणखत आणि कम्पोस्ट खताद्वारे देता येते. फॉस्फरसची आवश्यकता सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी किंवा शेणखत आणि कम्पोस्ट खताद्वारे पूर्ण करता येते. एकीकृत पोषक व्यवस्थापनाद्वारे पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करणे फायदेशीर ठरते. एक हेक्टर क्षेत्रासाठी 2.50 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीची मशागत करतेवेळी मातीत मिसळावे. पेरणीच्या वेळी 22 कि.ग्रॅ. यूरिया आणि 125 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 44 कि.ग्रॅ. डीएपी मध्ये 5 किलोग्रॅम यूरिया मिसळून प्रति हेक्टरी सरींमध्ये देणे पुरेसे असते.

Share