Time of Sowing, Spacing and Seed rate of Carrot

गाजराच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ, आंतरपीक आणि बियाण्याचे प्रमाण

  • पेरणीसाठी सुयोग्य वेळ:- देशी वाणांच्या पेरणीसाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आणि यूरोपियन वाणांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात.
  • पिकातील अंतर:- दोन ओळीतील अंतर 45 से.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 7. 5 से.मी असावे. बियाणे 1.5 से.मी. खोल पेरावे.
  • बियाण्याचे प्रमाण: 4-5 कि.ग्रा बियाणे प्रति एकर उपयुक्त असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Carrot fly

गाजरावरील माशीचे नियंत्रण:-

हानीची लक्षणे:-

  • गाजरावरील माशी विकसित होणार्‍या गाजराच्या आतील बाजूने चारही बाजूंनी अंडी घालते.
  • सुमारे 10 मिमी लांब अळी गाजराच्या मुळांच्या बाहेरील बाजूस मुख्यत्वे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खाऊन हानी करते. हळूहळू ती मुळात प्रवेश करते आणि आतील भागास हानी पोहोचवू लागते.
  • गाजराची पाने सुकू लागतात. काही पाने पिवळी तर काही लाल रंगाची होतात. परिपक्व मुळांच्या सालींवर निळसर करड्या रंगाची भोके दिसतात.

नियंत्रण –

  • गाजर कुळाशी संबंधित सर्व पिकांसाठी 3-5 वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • प्रोफेनोफोस 50 ईसी @ 400 मिली / एकर मात्रेची फवारणी करावी.
  • क्विनॉनोलफॉस 25 ईसी @ 300 मिली / एकर मात्रा फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed control in Carrot

गाजरातील तणाचे नियंत्रण करण्यासाठी 2 ते 3 वेळा निंदणी-खुरपणी करावी. त्याचवेळी छटाई करून रोपांमधील अंतर 4 ते 5 सेंटीमीटर ठेवावे. मुळे वाढू लागल्यावर सर्‍यांवर मातीचा हलका थर द्यावा. तणाचे नियंत्रण करण्यासाठी हेक्टरी 3.5 लीटर पेंडामेथलीन फवारावे. ही फवारणी करताना शेतात दमटपणा असणे आवश्यक आहे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share