दुधी भोपळ्यातील मावा
- शिशु आणि वाढ झालेल्या किड्यांची वसाहत पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर असते. ते पानांच्या उतींमधील रस शोषतात.
- ग्रस्त भाग पिवळा पडून सुकतो आणि वाकडा होतो. हल्ला तीव्र असल्यास पाने सुकतात आणि हळूहळू रोप मरते.
- फळांचा आकार आणि गुणवत्ता घटते.
- किडे पानांच्या पृष्ठभागावर किंवा रोपावर चिकटा सोडतात. त्यावर भुरा बुरशी वाढून रोपाचे प्रकाश संश्लेषण प्रभावित होते आणि रोपाची वाढ खुंटते.
- भुरा बुरशीने ग्रस्त फळ आकर्षक नसल्याने त्याची किंमत कमी येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share