फरसबी मधील अँथ्रॅकोनोस जिवाणूजन्य रोगाचा (श्यामवर्ण रोग) प्रतिबंध
लक्षणे:-
- फरसबीची पाने, खोडे आणि शेंगांवर या रोगाची लागण झाल्याचा परिणाम होतो.
- शेंगांवर छोटे-छोटे लाल करड्या रंगाचे डाग पडतात आणि झपाट्याने वाढतात.
- दमट हवामानात या डागांवर गुलाबी रंगाचे जिवाणू वाढतात.
- पानांवर आणि खोडावरदेखील काळे ओलसर खड्डे पडतात.
- पानाच्या शिरांवर देखील लागण होऊन त्या काळ्या पडतात.
प्रतिबंध:-
- रोगमुक्त प्रमाणित बियाणे वापरावे.
- रोगाची लागण झालेल्या शेतात किमान दोन वर्षे फरसबीची लागवड करू नये.
- रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
- कार्बेन्डाजिम 3 ग्रॅम/ किलो वापरुन बीजसंस्करण करावे.
- मेन्कोजेब 3 ग्रॅम प्रति ली. पाणी मिश्रणाची फवारणी करावी किंवा क्लोरोथायोनील 2 ग्रॅम प्रति ली पाण्याचे मिश्रण पाने फुटल्यापासून शेंगा तयार होईपर्यंत दर आठवड्याला फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share