Staking in Snake gourd

पडवळ/ वाळवंटी काकडीच्या वेलांना आधार देणे

  • पडवळ/ वाळवंटी काकडीचे पीक खूप वेगाने वाढते. बियाण्याच्या पेरणीनंतर दोन आठवड्यांनी वेली वेगाने वाढू लागतात.
  • जाळीदार मंडपाच्या वापराने फळांच्या आकारात आणि उत्पादनात वाढ होते तसेच फळे कमी सडतात आणि फळांची तोडणी आणि कीटकनाशकांची फवारणी सहजपणे करता येते.
  • मंडप 1.2- 1.8 मीटर उंच असावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation in Green gram (Moong)

मुगाच्या पिकासाठी जमिनीची मशागत

  • खरीपाच्या पिकासाठी पलटी नांगराने एकदा खोल नांगरणी करावी. पाऊस सुरू होताच 2-3 वेळा देशी नांगराने किंवा कल्टिव्हेटरने नांगरणी करून शेत तणमुक्त करावे आणि वखर वापरुन सपाट करावे.
  • वाळवीपासून बचाव करण्यासाठी क्लोरपायरीफॉस 1.5 % डी.पी. चूर्ण 10-15 कि.ग्रॅ/एकर या प्रमाणात मशागत करताना मातीत मिसळावे.
  • मुगाच्या उन्हाळी शेतीत रब्बी पिकाच्या कापणीनंतर लगेचच शेतात नांगरणी करून 4-5 दिवसांनंतर वेचणी करावी.
  • वेचणीनंतर 2-3 वेळा देशी नांगर किंवा कल्टिव्हेटरने नांगरणी करून आणि वखर चालवून शेताला सपाट आणि मातीला भुसभुशीत करावे. त्यामुळे त्यातील ओल संरक्षित होईल आणि चांगले बीज अंकुरण होईल.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of sucking pest in Bottle gourd by neem-based products

निंबोणी आधारित उत्पादनांनी दुधी भोपळ्यातील रस शोषणार्‍या किडीचे नियंत्रण

  • तेलकिडे (थ्रिप्स), मावा, शल्य कीड (स्केल्स), तुडतुडे आणि श्वेत माशी अशा लहान, मुलायम शरीराच्या किडे आणि माश्यांच्या विरोधात निंबोणीचे तेल सर्वाधिक प्रभावी असते.
  • पेरणीच्या वेळी आणि 30 दिवसांनी निंबोणीची पेंड @ 40 किग्रॅ प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळावी.
  • 10 दिवसांच्या अंतराने PNSPE (4%) किंवा निंबोणी/ पोंगामिया साबणाच्या द्रावणाची (8-10 ग्रॅम/ लीटर) फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Advantages of N fixation bacteria in okra

नायट्रोजन उपलब्ध करून देणार्‍या (एन फिक्सेशन) जिवाणुंचे भेंडीच्या पिकासाठी लाभ

  • एझोटोबॅक्टर हे स्वतंत्रजीवी नायट्रोजन स्थिरिकरण आणि वायुविजन करणारे जिवाणू असतात.
  • हे जिवाणू वातावरणातील नायट्रोजनला सतत जमिनीत जमा करत राहतात.
  • त्यांच्या वापराने प्रत्येक पिकासाठीच्या नायट्रोजन उर्वरकाच्या आवश्यकतेत  20 % ते 25 % पर्यंत घट होते.
  • ते बीज अंकुरणाची टक्केवारी वाढवतात.
  • खोडे आणि मुळांची संख्या आणि लांबी वाढवण्यास ते मदत करतात.
  • त्यांच्या वापराने रोगांची शक्यता कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of gummy stem blight in bottle gourd

दुधी भोपळ्यातील खोडावरील चिकटा आणि मर रोगाचे (गम्मी स्टेम ब्लाईट) नियंत्रण

  • या रोगात वेलाची मुळे वगळता इतर सर्व भागावर लागण होते.
  • पानांच्या कडांवर पिवळेपणा/ हिरवेपणाचा अभाव आणि कडांवर पाण्याने भरलेले डाग पारणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे असतात.
  • या रोगाने ग्रस्त वेलांच्या खोडांवर व्रण होतात आणि त्यातून लाल-करड्या, काळ्या रंगाचा द्राव पाझरू लागतो. खोडांवर राखाडी-काळया रंगाचे डाग पडतात आणि नंतर व्रणात मिसळतात.
  • दुधी भोपळ्याच्या बियांवर मध्यम राखाडी, काळे डाग पडतात.

नियंत्रण:

  • निरोगी बियाणे वापरावे.
  • पुनर्रोपणाचे निरीक्षण करावे आणि संक्रमित रोपांना उपटून शेताबाहेर फेकावे.
  • हल्ल्याची लक्षणे आढळताच क्लोरोथालोनिल 75% WP @ 350 ग्रॅम/ एकर किंवा टेबुकोनाज़ोल 25.9% EC @ 200 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of aphid in bitter gourd

कारल्यातील माव्याचे नियंत्रण

  • ग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत. त्यामुळे किडीचा प्रसार होणार नाही.
  • माव्याचा हल्ला झाल्याचे लक्षात येताच अॅसीफेट 75 % एसपी @ 300- 400 ग्रॅम/ एकर किंवा इमिडाक्लोप्रिड 17% एस एल @ 100 मिली प्रति एकर किंवा अॅसीटामाप्रिड 20 % एसपी @ 150 ग्रॅम  प्रति एकर मिश्रण दर पंधरा दिवसांनी फवारून त्याचे प्रभावी नियंत्रण करता येईल.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Advantages of PSB in Tomato

टोमॅटोच्या पिकासाठी फॉस्फरस विरघळवणार्‍या जिवाणूचे महत्व

  • हे जिवाणू फॉस्फरससह मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपर यासारख्या सूक्ष्म पोषक तत्वांना देखील रोपांना पुरवण्यास सहाय्य करतात.
  • ते मुळांचा वेगाने करण्यास सहाय्य करतात. त्यामुळे रोपाला पाणी आणि पोषक तत्वे सहजपणे मिळतात.
  • पीएसबी काही मॅलिक, सक्सिनिक, टार्टरिक अॅसिड आणि अॅसिटीक अॅसिड यासारखी काही खास जैविक आम्ले बनवतात. ही आम्ले फॉस्फरसची उपलब्धता वाढवतात.
  • ते रोग आणि शुष्कतेबाबतची प्रतिरोधकता वाढवतात.
  • त्यांचा वापर करण्याने फॉस्फेटिक उर्वरकांची आवश्यकतेत 25 -30% घट होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer requirements in muskmelon

खरबूजाच्या पिकासाठी उर्वरकांची मात्रा

  • जमिनीची मशागत करताना दर एकरात 10-15 टन शेणखत/ कम्पोस्ट मिसळावे.
  • यूरिया 110 किग्रॅ, सिंगल सुपर फॉस्फेट 155 किग्रॅ, आणि म्यूरेट ऑफ पोटाश 40 किग्रॅ वापरावे.
  • बियाणे पेरण्यापूर्वी एसएसपी, म्यूरेट ऑफ पोटाशची पूर्ण आणि यूरियाची एक तृतीयांश मात्रा द्यावी.
  • मुळांजवळ आणि खोडांपासुन दूर यूरियाची उरलेली मात्रा वापरावी आणि सुरुवातीच्या विकासाच्या काळात मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • पीक 10-15 दिवसांचे झाल्यावर गुणवत्ता वाढीसाठी आणि पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 19:19:19 + माइक्रोन्यूट्रिएंट @ 2-3 ग्रॅम/ लीटर पाणी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Alternaria leaf blight control in bottle gourd

दुधी भोपळ्यातील अंगक्षयाचे (एल्टरनेरिया) नियंत्रण

  • पानांवर पिवळे डाग पडतात. ते आधी राखाडी रंगाचे होऊन नंतर काळे पडतात.
  • हे डाग कडांपासून सुरू होऊन नंतर केन्द्रित होतात.
  • तीव्र लागण झालेल्या वेलांवर कोळशासारखी भुकटी जमा होते.
  • रोग रोखण्यासाठी शेतात स्वच्छता राखावी आणि पीक चक्र अवलंबावे.
  • बुरशिनाशक मॅन्कोझेब 75 % डब्ल्यू पी @ 400 ग्रॅम प्रति एकर किंवा हेक्साकोनाज़ोल 5% एससी @ 300 मिली/ एकर 10 दिवसांच्या अंतरावे फवारावे.
  • क्लोरोथालोनिल 75 डब्ल्यू पी @ 300  ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of mosaic virus in bottle gourd

दुधी भोपळ्यातील केवडा रोगाचे नियंत्रण

  • रोपे पुर्णपणे सुकतात. पानांवर पिवळे डाग पडतात.
  • रोपाची पाने खालील बाजूला मुडपतात आणि त्यांचा आकार सर्वसामान्य पानांहून लहान असतो.
  • फळांचा आकार बदलून लहान होतो. हा रोग माव्याद्वारे फैलावतो.

नियंत्रण: –

  • तण आणि रोगग्रस्त रोपे उपटल्याने संक्रमणाची शक्यता कमी होते.
  • रोग प्रतिरोधक वाणे वापरुन काही शेतकरी विषाणूचा फैलाव रोखतात.
  • इमिडाक्लोप्रिड (17.8% SL) @ 100-120 मिली प्रति एकर किंवा अॅसीफट (75% SP ) @ 140- 200 ग्रॅम प्रति एकर वापरुन रोग फैलावणार्‍या किडीचे नियंत्रण करावे.

 

Share