विशेषतः भारतात महिला शेतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. पण बरेचदा फक्त समाजाकडूनच नव्हे तर त्यांच्या स्वतःकडून सुद्धा त्यांचे योगदान दुर्लक्षित राहते .
त्यांचे शेतीतील योगदान अधोरेखित करण्यासाठी हैदराबाद मध्ये ६ मार्च पासून एक मेळावा आयोजित केला आहे. या २ दिवसांच्या मेळाव्याचा मुख्य हेतू ग्रामीण भारतातील स्त्रियांना विशेषतः शेती क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करणे हा आहे. इथे शेतीशी संबंधित अनेक क्षेत्रातील तज्ञ आपले संशोधन सादर करतील. तुम्हाला अनेक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि शास्त्रज्ञ या मेळाव्यात भाग घेऊन चर्चा करताना दिसतील.
या मेळाव्या बद्दल एका पत्रकार परिषदेत बोलताना तेलांगणा रायथू संघम चे उपाध्यक्ष, अरिबांदी प्रसाद राव, , यांनी असे म्हटले आहे की “स्त्रिया शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आता खूप काळ उलटून गेल्यावर तरी निदान आपण हे ओळखून असले पाहिजे आणि त्यांना सतावणाऱ्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे.”
Share