Storage technique for gram

हरबर्‍याच्या साठवणुकीचे तंत्र

  • सुमारे 13 ते 15 टक्के आर्द्रता असताना पिकाची कापणी केल्याने हरबर्‍याच्या दाण्यांचे प्रमाण घटते.
  • साठवणुक करताना योग्य काळजी घेतल्याने हरबर्‍याच्या गुणवत्तेशी संबंधित घटकांवर जसे रंग, बाह्य रूप इ. परिणाम होतो.
  • उत्पादनाच्या साठवणुकीपूर्वी त्याची सफाई करावी.
  • साठवण केलेल्या धान्याचे वेळोवेळी निरिक्षण करावे.
  • साठवणुकीच्या वेळी धान्यातील आर्द्रतेकडे खास लक्ष द्यावे. आर्द्रता कमी असल्यास दाणे तुटू शकतात.
  • वातावरण अनुकूल नसल्यास धान्य अधिक तुटते.
  • निरोगी दाण्यांची बाजारातील किंमत जास्त असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Lesser grain borer control in wheat

साठवणुक केलेला गहू पोखरणार्‍या किड्यांचे नियंत्रण

  • धान्य साठवण्यापूर्वी त्याला कडक उन्हात वाळवावे.
  • हवा खेळती असलेल्या सीमेंट किंवा कॉन्क्रीटने बांधलेल्या पक्क्या गोदामाचा वापर करावा.
  • गोदामातील धान्याच्या थप्प्यांमध्ये किमान 2 फुट अंतर ठेवावे.
  • गोदामात धान्याच्या पोत्यांची थप्पी लावताना पोती छताला किंवा भिंतींना चिकटणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
  • गोदामात हवा खेळती असल्यास धान्यातील आर्द्रता वाढत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या रोगांपासून आणि किड्यांपासून धान्याचा बचाव होतो.
  • धान्याच्या साठवणुकीसाठी दमट आणि ओल्या पोत्यांचा वापर करू नये.
  • कोरड्या मोसमात महिन्यातून किमान एकदा आणि पावसाळ्यात आठवड्यातून किमान एकदा धान्याची पाहणी करावी. धान्यात प्रमाणाबाहेर आर्द्रता असल्यास ते गोदामातून बाहेर काढून वाळवावे.
  • मेलाथियाँन @ 100 मिलीग्रॅम प्रति वर्ग मीटर फवारावे.
  • डाईक्लोरवास @ 0.5 ग्रॅम प्रति वर्ग मीटर वापरल्याने देखील धान्याचा संक्रमणापासून बचाव होतो.
  • डेल्टामेथ्रिन की 10 ग्रॅम प्रति लीटर द्रावण गोदामात फवारावे.
  • कीटकनाशके विषारी असल्याने त्यांच्या लेबलवरील सर्व खबरदारीच्या सूचनांचे पालन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate in green gram (Moong)

मुगाच्या बियाण्याचे प्रमाण

  • खरीपाच्या हंगामासाठी 8-9 किग्रॅ/ एकर या प्रमाणात बियाणे वापरावे तर उन्हाळी हंगामासाठी 12-15 किग्रॅ/ एकर या प्रमाणात बियाणे वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Maturity index of wheat

गव्हाच्या पिकाच्या परिपक्वतेची लक्षणे

  • दाणे कडक होतात आणि पेंढा पिवळ्या रंगाचा, कोरडा आणि ठिसुळ होतो तेव्हा कापणी केली जाते.
  • धान्यात सुमारे 15 टक्के आर्द्रता असताना कापणी केली जाते.
  • कापणीच्या वेळी ओंबी पिवळी झालेली असावी लागते.
  • गव्हाची पेरणी केल्यापासून 110-130 दिवसांनी कापणी केली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Climatic conditions for green gram (moong) cultivation

मुगाच्या शेतीसाठी आवश्यक हवामान

  • मुगाच्या शेतीसाठी उष्ण दमट हवामान आणि 25-35℃ तापमान उत्तम असते.
  • जेथे वार्षिक पर्जन्यमान 60-75 cm असते असा भाग मुगाच्या शेतीसाठी सर्वोत्तम असतो.
  • पेरणीच्या वेळी 25-30℃ तापमान चांगले असते.
  • कापणीच्या वेळी 30-35℃ तापमान चांगले असते.
  • मूग सर्वधिक चिवट दळदार पीक असून ते बर्‍याच प्रमाणात शुष्कता सहन करू शकते.
  • परंतु पाणी तुंबणे आणि ढगाळ हवा या पिकासाठी हानिकारक असते.
  • हे पीक भारतात तिन्ही हंगामात घेतले जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Anthracnose control in watermelon

कलिंगडावरील क्षतादिरोगाचे (अँन्थ्रेक्नोज) नियंत्रण

  • शेतात स्वच्छता ठेवावी आणि योग्य पीक चक्र अवलंबून रोगाची लागण रोखावी.
  • कार्बोंन्डाजिम 50% WP ची 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे मात्रा वापरुन बीजसंस्करण करावे.
  • 10 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 400 ग्रॅम प्रति एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम प्रति एकरच्या द्रावणाची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of mosaic virus in bottle gourd

दुधी भोपळ्यातील केवडा रोगाचे नियंत्रण

  • रोपे पुर्णपणे सुकतात. पानांवर पिवळे डाग पडतात.
  • रोपाची पाने खालील बाजूला मुडपतात आणि त्यांचा आकार सर्वसामान्य पानांहून लहान असतो.
  • फळांचा आकार बदलून लहान होतो. हा रोग माव्याद्वारे फैलावतो.

नियंत्रण: –

  • तण आणि रोगग्रस्त रोपे उपटल्याने संक्रमणाची शक्यता कमी होते.
  • रोग प्रतिरोधक वाणे वापरुन काही शेतकरी विषाणूचा फैलाव रोखतात.
  • इमिडाक्लोप्रिड (17.8% SL) @ 100-120 मिली प्रति एकर किंवा अॅसीफट (75% SP ) @ 140- 200 ग्रॅम प्रति एकर वापरुन रोग फैलावणार्‍या किडीचे नियंत्रण करावे.

 

Share

Collar rot control in bottle gourd

दुधी भोपळ्यातील खोड कूज रोगाचे नियंत्रण

  • खोडाच्या आधारावर गडद राखाडी हिरव्या रंगाचे पाणी भरलेले डाग उमटतात. शेवटी संपूर्ण रोप मरते.
  • या रोगाच्या संक्रमण अवस्थेत पांढर्‍या रंगाच्या धाग्यासारख्या तंतुंचा विकास होतो.
  • ग्रस्त रोपे खोडापासून जमिनीतून उखडली जातात पण खोडाचा मुळे असलेला भाग जमिनीतच राहतो.
  • कार्बेन्डाजिम @ 2.5 ग्रॅम प्रति कि. ग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • बियाणी वाफ्यात वरवर पेरावीत.
  • मुळांजवळ मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाजिम 12% WP @  400 ग्रॅम / एकर किंवा थायोफनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम/ एकर जिवाणूनाशक वापरुन ड्रेंचिंग करावे.
  • शेतात पूर्वी लावलेल्या पिकाचे अवशेष जमिनीत खोल गाडावेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer dose in bitter gourd

कारल्याच्या पिकासाठी उर्वरकांची मात्रा

  • उर्वरकांचा वापर मातीची उर्वरता, वातावरण आणि लागवडीचा हंगाम यावर अवलंबून असते.
  • जमिनीची मशागत करताना एकरी 6-8 टन शेणखत/ कंपोस्ट खत मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • एक एकरासाठी युरिया 30-40 किलो, डीएपी 35-50 किलो आणि एमओपी 20-40 किलो वापरावे.
  • लागवड करण्यापूर्वि युरियाची अर्धी आणि डीएपीची संपूर्ण मात्रा आणि पूर्ण एमओपी वापरावे. उरलेली युरियाची अर्धी मात्रा समान भागात विभागून पेरणीनंतर 15 दिवसांनी आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी अशी दोनदा द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Flower promotion nutrients in snake gourd

काकडीमधील फुलोर्‍याच्या वृद्धीसाठी सुचना

  • काकडीच्या पिकासाठी फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • पेरणीच्या 40-45 दिवसांनी काकडीच्या पिकाची फुलोरा येण्याची अवस्था सुरू होते.
  • काकडीच्या फुलोर्‍यात वाढ करण्यासाठी खालील उत्पादनांचा वापर करावा:
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली./एकर फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली. /एकर वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्वांची 300 ग्रॅम/एकर या प्रमाणात फवारणी करावी.
  • 2 ग्रॅम/एकर या प्रमाणात जिब्रेलिक अॅसिड देखील फवारता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share