- असिचिंत भागात हरबर्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. सिंचित भागात पेरणी 30 ऑक्टोबर पर्यंत करणे आवश्यक असते.
- अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतात योग्य संख्येने रोपे असणे अत्यावश्यक असते. रोपांची संख्या योग्य तेवढी राहण्यासाठी प्रती एकक बियाण्याचे प्रमाण तसेच सर्यांमधील व रोपांमधील अंतर प्रमाणबद्ध असणे आवश्यक असते.
- असिंचित शेतात हेक्टरी 80 कि.ग्रॅ. तर सिंचित शेतात हेक्टरी 60 कि.ग्रॅ. बियाणे पुरेसे असते.
- असिंचित शेतात पीक घेण्यासाठी बियाणे 7 ते 10 सें.मी. एवढ्या तर सिंचित क्षेत्रात ते 5 ते 7 सें.मी. खोलीवर पेरावे. दोन सरींमधील अंतर 45 ते 50 सें.मी. ठेवावे.
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
Share