अनु. | आरती दोडके (व्ही एन आर बियाणी) | |
1. | पेरण्याचा काळ | मार्च |
2. | बियाण्याचे प्रमाण | प्रति एकर एक ते दोन किलो |
3. | दोन ओळीत पेरण्याचे अंतर | १२० ते १५० सेंटीमीटर |
4. | दोन रोपात ठेवण्याचे अंतर | ९० सेंटिमीटर |
5 | पेरणीची खोली | दोन ते तीन सेंटीमीटर |
6. | रंग | आकर्षक हिरवा |
7 | आकार | लांबी २४- २५ सेंटीमीटर रुंदी २.४ इंच |
8 | वजन | २०० ते २२५ ग्राम |
9 | पहिली तोडणी | ५५ दिवस |
भोपळा, कारले, काकडी, कलिंगड इत्यादी पिकांच्या शेतीसाठी कोणते हवामान योग्य आहे?
- वेलवर्गीय भाज्या या उपोष्ण कटिबंधीय हवामानात होतात आणि त्यांची उत्तम वाढ होण्यासाठी आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी त्यांना उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते
- त्यांची चांगली वाढ आणि उत्तम फळधारणा होण्यासाठी रात्र आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे १८ ते २२ डिग्री सेल्सिअस आणि ३० ते ३५ डिग्री सेल्सिअस असणे योग्य आहे.
- २५ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमानाला बिया उत्तम प्रकारे आणि वेगाने रुजून येतात.
- योग्य तापमानाला वाढवलेल्या रोपांना मादी फुले आणि फळे जास्त प्रमाणात येतात.
बटाट्याची साले फेकू नका ती तेवढीच महत्त्वाची आहेत!
- बटाट्याच्या सालात पोटॅशियम आढळते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
- बटाटे सालासकट खाल्ल्यामुळे शरीराला धोकादायक अशा अति नील किरणांचा परिणाम कमी होतो.
- बटाट्याच्या सालात भरपूर प्रमाणात पोषक द्रव्य असतात त्यामुळे शरीराची चयापचय क्रिया दुरुस्त होण्यास मदत होते
- बटाट्याची साले आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात कारण त्यात उत्तम प्रमाणात लोह असते त्यामुळे रक्तक्षयाचा धोका कमी होतो.
कांदे आणि लसुण कुजू नयेत यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा
- कांदे आणि लसुण यांच्या दीर्घकालीन साठवणी करिता तापमान आणि सापेक्ष आर्द्रता हे महत्त्वाचे घटक आहेत.
- जुलै ते सप्टेंबर मध्ये आर्द्रता ७० टक्क्यांहून अधिक असल्यामुळे कांदे कुसण्याची शक्यता वाढते.
- तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तपमान कमी झाल्यामुळे कांद्याला मोड येण्याची समस्या वाढते.
- अधिक चांगल्या साठवणी करता कोठाराचे तापमान २५ ते ३० डिग्री सेल्सिअस असावे तर आर्द्रता ६५ ते ७० टक्के असावी.
ग्रामोफोन च्या ग्राम सल्लागाराने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी पुरस्कार जिंकला आहे.
आज शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी सर्वात जास्त गरज कशाची असेल तर योग्य वेळी योग्य पर्यायांची उपलब्धता. आम्हाला ग्रामोफोन मध्ये शेतकऱ्यांची ही गरज व्यवस्थित समजते. आणि म्हणूनच ग्रामोफोन च्या अविरत प्रयत्नांमुळे तीन लाख पेक्षा जास्त शेतकरी ग्रामोफोनशी जोडले गेले आहेत आणि समृद्धीची नवी कहाणी लिहित आहेत.
शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्याच्या ग्रामोफोन च्या या उत्कट भावनेला त्यांचे ग्राम सल्लागार खतपाणी घालत आहेत. त्यांना स्थानिक भाषेत “ग्रामोफोन ग्राम सल्लागार” असे म्हणतात. असेच एक उत्कट आवड असणारे आणि कामसू ग्राम सल्लागार आहेत श्री. संजय पाटीदार. त्यांनी जमीन समृद्धी किट वापरून त्यांच्या प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची सुपीकता वाढवली आहे. शेताची सुपीकता वाढवण्यासाठी ग्रामोफोन कंपनीने जमीन समृद्धी किट आणले आहे. तुम्ही ग्रामोफोनच्या मोबाईल ॲप वरून किंवा टोल फ्री नंबर ला कॉल करून हे किट मागवू शकता.
आमचे ग्राम सल्लागार संजय यांनी शेतकऱ्यांमध्ये जमीन समृद्धी किट चा प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या असंख्य मीटिंग घेतल्या आहेत आणि अनेक वेळा त्यांच्या शेतांना भेटी देऊन जमीन समृद्धी किट मुळे शेतीची उत्पादन आणि प्रत यात कशी वाढ आणि सुधारणा होते हे शेतकऱ्यांना समजावून सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुयोग्य फायदा मिळू शकतो.
संजय यांचा निर्धार, अचूक योजना आणि आणि कठोर परिश्रम फळाला आले आणि त्यांनी पहिला “जमीन समृद्धी किट शतक कर्ते” हा किताब मिळवला. संजय पाटीदार हे असे एकमेव उदाहरण म्हणून पुढे आले आहेत की ज्यांनी हे सिद्ध केले आहे की शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे ही जगातील सर्वात जास्त समाधान देणारी गोष्ट आहे. आणि तुम्ही जर हे पूर्ण समर्पण भावनेने आणि कठोर परिश्रम घेऊन केले तर तुम्ही आश्चर्य घडवून आणू शकता.
Shareगव्हाच्या पिकावर पोटॅशियम युक्त खत फवारण्याचे फायदे
- पोटॅशियम पानांची छिद्रे उघड करण्याचे कार्य नियंत्रित करते त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होण्यास मदत होते.
- पोटॅशियम रोपांमध्ये प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ पदार्थ यांचे संश्लेषण घडवून आणण्यास देखील जबाबदार आहे.
- पोटॅशियम नेहमीच अतिरेकी प्रमाणात होणाऱ्या ओला दुष्काळ सदृश पाणीपुरवठ्याला प्रतिरोध करण्यात चांगली कामगिरी बजावते.
- पोटॅशियम रोपांमध्ये वाढीशी संबंधित संप्रेरके सक्रिय होण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावते.
- पोटॅशियम रोपांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.
काकडीसाठी शेत तयार करणे
- सुरूवातीच्या टप्प्यत शेत चार-पाच वेळा नांगरून ठिसूळ बनवावे आणि शेवटच्या नांगरणी पूर्वी जमिनीमध्ये दर एकरी १०–१५ टन शेणखत मिसळावे
- जर का जमिनीत नेमाटोड कृमी, वाळव्या किंवा लाल मुंगळे यांचा प्रादुर्भाव झाला असेल तर दर एकरी दहा किलो कार्बोफ्युरॉन वापरा
- शेत जमीन समपातळीत आणल्यावर दोन ते अडीच सेंटीमीटर अंतरावर ६० सेंटिमीटर रुंद सरी बनवा.
- सरींची लांबी पाण्याचा स्रोत, ऋतू, पाऊस, जमिनीचा उतार यावर अवलंबून असते.
काकडीच्या पिकाची योग्य प्रकारे लागवड केली तर शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळू शकते.
- बियाणे जमिनीत एक ते डिड मीटर अंतरावर सरीमध्ये लावावे.
- जेव्हा काकडीचा वेळ मंडपावर चढवला जातो तेव्हा ३*१ मीटर अंतर ठेवावे.
- जेव्हा काकडीचा वेळ मंडपावर चढवला जातो तेव्हा ३*१ मीटर अंतर ठेवावे. जेव्हा बियाणे ०.५ ते ०.७५ मीटर अंतरावर लावले जाते तेव्हा प्रत्येक ठिकाणी ४ ते ६ बियाणे टाकावे.
- डोंगराळ प्रदेशात प्रत्येक छोट्या टेकडीवर दोन रोपे वाढू द्यावीत.
कारल्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जल सिंचनाची योग्य पद्धत
- कारल्याच्या पिकाला जास्त प्रमाणात दिलेले किंवा निचरा न होता साठून राहणारे पाणी सहन होत नाही.
- पेरल्यानंतर किंवा रोपे लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी पिकाला पहिले पाणी द्यावे आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी द्यावे.
- जमिनीच्या वरच्या ५० सेमी थरात चांगला ओलावा ठेवावा कारण बहुतेक मुळे तिथेच असतात.
कोथिंबिरीच्या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी जलसिंचनाची योग्य पद्धत
- पेरल्यानंतर ताबडतोब पहिल्यांदा दा जलसिंचन करावे.
- पहिल्या सिंचनानंतर चौथ्या दिवशी दुसरे जलसिंचन करावे.
- त्यानंतर दर ७–१० दिवसांनी पुढील जल सिंचन करीत जावे.