- सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर पानांच्या मागच्या बाजूला कडूनिंब तेल फवारावे
- दर आठवड्यात दोन वेळा प्रॉपराईट 57% ईसी दर एकरी 400 मिली फवारावे.
- दर आठवड्यात दोन वेळा अबामेक्टीन 1.8% ईसी प्रत्येक एकरी 150 मिली फवारावे.
कलिंगडामध्ये लाल किडे ओळखणे:-
- अळ्या तरुण आणि प्रौढ कीटक पानांच्या खालच्या बाजूने भेगा पाडतात.
- ते पानांच्या पेशीतील रस शोषून घेतात त्यामुळे वेल आणि पानांमध्ये पांढऱ्या रंगाचे डाग तयार होतात.
- अतिरेकी प्रमाणात संसर्ग झाला असेल तर किडे पानांच्या खालच्या बाजूच्या पृष्ठभागावर जाळी तयार करतात.
वांग्याच्या पिकावरील तुडतुड्यांचे व्यवस्थापन –
- प्रति एकर अॅसेटामिप्रिड 20% डब्ल्यू पी 80 ग्रॅम फवारून तुडतुड्यांचे नियंत्रण करता येते.
- पुन्हा रोपण केल्यावर 20 दिवसांनी इमिडाक्लोप्रिड 17.8% प्रति एकर 80 मिली फवारावे.
- प्रति एकरी 100 ग्रॅम एव्हिडंट (थिआमेथॉक्सॅम) फवारावे किंवा
- अबॅसिन (अबामेक्टीन) 1.8% ईसी प्रत्येक एकरी 150 मिली फवारावे.
वांग्याच्या पिकावरील तुडतुडे कसे ओळखावेत –
- पिले आणि प्रौढ कीटक पानाच्या खालच्या बाजूने रस शोषून घेतात.
- संसर्ग झालेली पानांच्या कडा वरच्या बाजूला वळण्यास सुरुवात होते. पान कधी कधी पिवळट पडते आणि त्यावर जळल्यासारखे डाग पडतात.
- ते अनेक सूक्ष्म जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार करतात. त्यांच्यामुळे पर्णगुच्छ, मोझेक इत्यादि रोगांचा प्रसार होतो.
- रोगाच्या प्रादुर्भावामुळे फलधारणेवर विपरीत परिणाम होतो.
मूग पिकावरील माव्याचे व्यवस्थापन
- प्रति एकरी कॉन्फिडॉर (इमिडाक्लोप्रिड) 100 मिली + ब्युव्हेरिआ बॅसिआना (एक प्रकारची मित्र बुरशी) 250 ग्रॅम फवारावे किंवा
- प्रति एकरी थिआमेथॉक्सॅम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेड सी 100 ग्रॅम फवारावे. किंवा
- प्रति एकरी अॅसेटामिप्रिड 20% एस पी 40-80 ग्रॅम फवारावे.
- रोपावरील किडे हाताने वेचून काढावेत किंवा रोपाचा संसर्ग झालेला भाग काढून टाकावा.
- पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी किंवा खते देऊ नयेत.
मूग पिकावरील मावा रोग कसा ओळखावा –
- गंभीर संसर्गामुळे पाने आणि कोंब वळतात, अकाली पिकतात आणि रोपाची वाढ खुंटते.
- मावा कीटकांनी पाने खाऊन टाकलेल्या गोड उत्सर्जनामुळे रोपांना अनेक बुरशीजन्य रोग होतात.
- पानांवर बुरशीचे डाग तयार होणे हे या रोगाचे निदर्शक आहे.
- उष्ण आणि कोरडे हवामान झाडातील रस शोषणार्या मावा कीटकांच्या वाढीसाठी योग्य ठरते.
खरबूज वर्गीय पिकामध्ये पाने खाणार्या कीटकांचा बंदोबस्त केल्यामुळे उत्पादन वाढते
- वाढीच्या हंगामात परिणाम झालेली रोपे काढून टाकून नष्ट करावी.
- प्रति एकरी 100 ग्रॅम वॅपकिल (अॅसिटाम्प्रिड) फवारावे. किंवा
- प्रति एकरी कॉन्फिडॉर (इमिडाक्लोप्रिड) 100 मिली + ब्युव्हेरिआ बॅसिआना (एक प्रकारची मित्र बुरशी) 250 ग्रॅम किंवा
- प्रति एकरी थिआमेथॉक्सॅम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेड सी 100 ग्रॅम फवारावे. किंवा
- प्रति एकरी अबॅसिन (अबॅमेक्टिन 1.8% ईसी) 150 मिली फवारावे.
चिबूड पिकावरील पाने खाणारी अळी कशी ओळखावी –
- पाने खाणारे प्रौढ कीटक लहान काळ्या पिवळ्या माशी प्रमाणे दिसतात
- अळ्या त्यांचा विकास पूर्ण झाल्यानंतर पानावरून निघतात आणि पानाच्या आत कोष बनवतात
- मादी माश्या पानाला भोके पाडतात, रोपाचा रस शोषून घेतात आणि पानाच्या पेशीमध्ये अंडी घालतात
- या नुकसानीमुळे रोपांची वाढ खुंटते परिणामी रोपातला जोम संपून जातो आणि फळांचे उत्पादन कमी येते
· पानांवर कुरतडल्यासारखे डाग दिसून येते
Shareवेलवर्गीय पिकांमध्ये फळ माशी चे नियंत्रण कसे करावे
- संसर्ग झालेली फळे गोळा करून नष्ट करावीत
- फळ माशी ने अंडी घालू नयेत म्हणून माश्यांचे सापळे (फेरोमोन ट्रॅप) लावता येतात
- शेतात मक्याची रोपे लावणे परिणामकारक ठरते कारण माश्या अशा उंच रोपांवर बसतात
- फळ माश्यांच्या सुप्त अवस्थेतील कीटक उघड्यावर आणण्यासाठी शेताची खोलवर नांगरट करणे आवश्यक आहे.
- प्रतिएकरी 250 ते 500 मिली डिक्लोर्व्होस 76% ईसी फवारावे किंवा
- प्रति एकरी दोनशे मिली लॅंबडा सायहॅलोथ्रिन 4.9% सीएस फवारावे किंवा
- प्रत्येक एकरी प्रोफेनोफोस 40% ईसी + सायपरमेथ्रिन 4% ईसी फवारावे
भोपळ्यावरील फळमाशी कशी ओळखावी
- हे किडे फळांना भोके पाडतात आणि आतला रस शोषून घेतात
- संसर्ग झालेली फळे खराब होऊन गळून पडतात
- या माश्या अंडी घालण्यासाठी कोवळ्या फळांना प्राधान्य देतात
- माशी अंडी घालण्यासाठी फळाला भोक पडते या भोकातून फळाचा रस बाहेर येताना दिसतो
- यामुळे फळे वेडीवाकडी आणि खराब आकाराची तयार होतात
- हे किडे फळांचा गर आणि कोवळ्या बिया खातात त्यामुळे तयार होण्यापूर्वीच फळे गळून पडतात