- शेत स्वच्छ ठेवावे आणि आळीपाळीने पिके घेण्याची सवय ठेवावी. त्यामुळे या रोगास प्रतिबंध होतो.
- दर दहा पंधरा दिवसाच्या अंतराने मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी प्रति एकरी 400 ग्राम फवारावे किंवा
- किटाझिन 48.00 डब्ल्यू /डब्ल्यू प्रति एकरी 400 मिली दर 10-15 दिवसांनी फवारावे
- दर दहा दिवसाच्या अंतराने क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यू पी प्रति एकरी 300 ग्रॅम फवारावे.
दुधी भोपळ्यावरील अल्टर्नेरिआ लीफ ब्लाईट (पानांचा बुरशीजन्य रोग) कसा ओळखावा?
दुधी भोपळ्यावरील पानांचा बुरशीजन्य रोग खालील लक्षणांवरून ओळखता येतो. –
- पानांवर सुरुवातीला पिवळे डाग दिसतात ते नंतर तपकिरी रंगाचे होतात आणि जुने झाल्यावर शेवटी काळे बनतात
- ते साधारणपणे ते कडेला सुरू होतात आणि एककेंद्रीय वर्तुळे तयार करतात
- खूप जास्त परिणाम झालेल्या वेली जळलेल्या कोळशाच्या प्रमाणे दिसतात
जमीन तपासण्याची उद्दिष्टे
- पिकासाठी रासायनिक खते किती प्रमाणात वापरावीत हे निश्चित करण्यासाठी
- अल्कधर्मी आणि आम्लधर्मी जमीन सुधारण्याचा बरोबर मार्गकोणता हे माहीत करून घेऊन जमीन सुपीक
- बनवण्यासाठी
- शेतीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरवण्यासाठी
उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आरोग्यपूर्ण म्हणून ओळखली जाणारी कोरफड
- उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये कोरफड आरोग्यपूर्ण म्हणून ओळखली जाते
- कोरफडी मध्ये कर्करोगाशी लढण्याची क्षमता आहे
- कोरफड हे एक एक नैसर्गिक रेचक आहे
- रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते
- पोटाचे विकार दूर करून पचन सुधारते
वेलवर्गीयपिकामध्ये लाल किडे ओळखणे:-
- लाल कोळी किडे एक मिमी लांब असतात आणि ते नुसत्या डोळ्यांना दिसणे कठीण असते.
- कोळी किडे पानांच्या खालच्या बाजूला वस्त्या बनून राहतात.
- अळ्या तरुण आणि प्रौढ कीटक पानांच्या खालच्या बाजूने भेगा पाडतात.
- ते पानांच्या पेशीतील रस शोषून घेतात त्यामुळे वेल आणि पानांमध्ये पांढऱ्या रंगाचे डाग तयार होतात
कार्ल्यामध्ये आधारासाठी खांब आणि जाळीदार ताटी लावणे
- रोपे लावल्यानंतर फक्त दोन आठवड्यात कार्ली अतिशय वेगाने वाढतात आणि वेलींचा खूप विस्तार होतो.
- आधारासाठी खांब आणि जाळीदार ताट्या लावल्यामुळे फळांचे उत्पादन आणि फळांचा आकार वाढतो आणि
- आणि कूज कमी होते
- फवारणीमुळे पिकाच्या उत्पादनात नेहमी मदत होते
- जाळीदार ताटी खोडापासून 1.2-1.8 मीटर अंतरावर आणि 1.2-1.8 मीटर उंच बांधाव्या
चिबूड आणि कलिंगड पिकामध्ये चिमटी काढणे
- कलिंगडाच्या रोपाची अतिरेकी वाढ थांबवण्यासाठी चिमटी तयार केल्या जातात
- कलिंगडाच्या मुख्य खोडावर जेव्हा पुरेशी फळे असतात तेव्हा हे मुख्य जोमदार खोड नीट रहावे म्हणून
- चिमटीचा उपाय केला जातो
- चिमटी आणि नको असलेल्या जखमा कापून टाकल्यामुळे फळांना चांगले पोषण मिळते आणि फळे चांगल्या
- प्रकारे विकसित होतात.
- जेव्हा एखाद्या वेलीवर अधिक फळे असतात तेव्हा छोटी आणि अशक्त दिसणारी फळे काढून टाका म्हणजे मुख्य
- फळे अधिक चांगल्या प्रकारे वाढतात.
- अनावश्यक फांद्या काढल्यामुळे कलिंगडाला उत्तम पोषण मिळते आणि ते वेगाने वाढते.
भोपळा आणि दोडके पिकावरील भोपळी भुंग्याचे नियंत्रण
- जुन्या पिकाचे अवशेष नष्ट करा
- पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत हे कीटक दिसले तर ते हाताने पकडून नाहीसे करा.
- पिकावर सायपरमेथ्रीन 25% ईसी प्रति एकर 150 मिली+ डायलेटंट30%ईसी प्रतिएकर 300 मिली फवारा किंवा
- कीटकांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर सुरवातीला पंचवीस दिवसांनी आणि नंतर दर पंधरवड्याला कार्बारील
- 50%डब्ल्यू पी प्रति एकरी 400 ग्रॅम फवारा प्रति एकरी 250-350 मिली डायक्लोर्वोस (डीडीव्हीपी) 76% ईसी फवारल्यास कीटकांचे समाधान कारक नियंत्रण होते.
भोपळा आणि दोडके पिकामध्ये लाल भोपळा भुंग्याची ओळख
- अळी वनस्पतीचा जमिनीखालील भाग आणि जमिनीला स्पर्श करणारी फळे खातात.
- खराब झालेली मुळे आणि संसर्ग झालेला भूमिगत भाग, आणि देठाचा भाग सॅप्रोफेटिक बुरशीच्या दुय्यम संसर्गामुळे सडण्यास सुरवात होते आणि वेलींची फळे सुकू लागतात.
- संसर्गझालेली फळे मानवी वापरासाठी अयोग्य बनतात.
- प्रौढ भुंगे पानाचा पातळ भाग अधाशीपणे खाऊन त्यावर अनियमित आकाराची छिद्रे बनवतात.
- त्यांना कोवळी रोपटी आणि कोवळी पाने अधिक आवडतात आणि नुकसान झाल्यामुळे कोवळी रोपे मरू शकतात.
तुम्हाला मोहरी आणि हरभरा पिकाचे नवीन आधारभूत मूल्य माहित आहे का?
मोहरी आणि हरभरा पिकांच्या काढणीची वेळ आली आहे आणि अशा प्रकारे केंद्र सरकारने या दोन पिकांसाठी आधारभूत किंमत निश्चित केली आहे. हरभर्याची सुधारित आधारभूत किंमत 4875 ठरवण्यात आली आहे तर मोहरीची आधारभूत किंमत 4425 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
नोंदणीबाबत माहिती–
- शेतकर्यांना नोंदणीसाठी बोटांचे ठसे सादर करावे लागतील.
- आधार कार्ड, जनाधार कार्ड / भामाशाह कार्ड, बँक पासबुकची छायाप्रत आणि गिरदावरीच्या पी –35 चा अनुक्रमांक आणि तारीख यासारख्या काही महत्वाच्या कागदपत्रांची छायाचित्र-प्रत शेतकर्यांना द्यावी लागेल.
- हे लक्षात घ्यावे की फक्त एक शेतकरी एका मोबाइल नंबरसह नोंदणी करू शकतो. नोंदणीसाठी शेतकर्याला 31 रुपये द्यावे लागतील.