बटाट्यातील विषाणूजन्य पर्ण गुंडाळी रोगाचे नियंत्रण

बटाट्यातील विषाणूजन्य पर्ण गुंडाळी रोगाचे नियंत्रण:-

  • विषाणूमुक्त बियाणे वापरुन या रोगाचे नियंत्रण करता येते.
  • मावा मुक्त जमिनीत बियाणे तयार करावे.
  • रोगवाहक माव्याची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त सम्पर्क/दैहिक कीटकनाशके वापरावीत.
  • माव्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी अॅसिटामिप्रिड 20% एसपी @ 10 ग्रॅ / 15 लीटर पाण्यातून किंवा इमिडेकलोप्रिड 17.8% एसएल @ 10 एमएल / 15 लीटर पाण्यातून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

भेंडीवरील केवडा रोगाचे नियंत्रण

भेंडीवरील केवडा रोगाचे नियंत्रण:-

  • हा रोग श्वेत माशी नावाच्या किडीमुळे होतो.
  • भेंडीच्या पिकाच्या सर्व अवस्थात हा रोग होतो.
  • या रोगामुळे पानांच्या शिरा पिवळ्या पडतात.
  • शिरा पिवळ्या पडल्यावर पाने मुडपतात.
  • रोगग्रस्त फळे फिकट पिवळी, विकृत आणि कडक होतात.

नियंत्रण:-

  • विषाणूग्रस्त रोपे आणि रोपांचे भाग उपटून नष्ट करावीत.
  • परभणी क्रांति, जनार्दन, हरिता, अर्का अनामिका आणि अर्का अभय अशा काही जाती व्हायरससाठी सहनशील असतात.
  • रोपांच्या वाढीच्या वेळेस उर्वरकांचा अतिरिक्त वापर करू नये.
  • शक्यतो भेंडीची पेरणी वेळेपूर्वी करावी.
  • शेतीत वापरली जाणारी सर्व अवजारे स्वच्छ ठेवावीत. त्यामुळे उपकरणांच्या द्वारे रोगाचा प्रसार होणार नाही.
  • या रोगाने ग्रस्त पिकांसोबत भेंडीचे पीक घेऊ नये.
  • श्वेत माशीच्या नियंत्रणासाठी -5 चिकट सापळे रचावेत.
  • डाइमिथोएट 30% ई.सी. 250  मिली /एकरचे पाण्यातील मिश्रण फवारावे.
  • इमिडाइक्लोप्रिड 17.8% SL 80 मिली /एकरची मात्रा फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

भेंडीच्या पिकासाठी सिंचन

भेंडीच्या पिकासाठी सिंचन:-

  • पहिले सिंचन पाने फुटण्याच्या वेळी करावे.
  • उन्हाळ्यात 4-5 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • तापमान 400C असल्यास थोडे थोडे सिंचन करत राहावे. त्यामुळे मातीतील ओल टिकून राहील आणि उत्तम फलधारणा होईल.
  • पाणी साचणे किंवा रोपे सुकवणे टाळावे.
  • ठिबक सिंचन (ड्रिप इरिगेशन) पद्धतीने 85% पर्यन्त पाणी वाचवता येते.
  • फल/बीजधारणा होताना दुष्काळी परिस्थिति असल्यास पिकाची 70% पर्यन्त हानी होते.

नीचे दिए गए बटन पर क्लिक करके अन्य किसानों के साथ साझा करें।

Share

कारल्यावरील लाल भुंगेऱ्याचे निदान

  • अळी मुळांवर, रोपाच्या जमिनीखालील भागावर आणि जमिनीला टेकलेल्या फळांवर चरते.
  • हानी झालेली मुळे आणि जमिनीखालील खोडाचे भाग सॅप्रोलायटिक बुरशीच्या दुय्यम संसर्गाने सडू लागतात आणि वेलीवरील अपरिपक्व फळे वाळतात.
  • लागण झालेली फळे खाण्यास योग्य राहत नाहीत..
  • वाढ झालेले किडे पानांवर अधाशीपणे चरून भोके पाडतात.

बीजरोपे आणि कोवळ्या पानांवर त्यांचा भर असतो. त्यांच्यामुळे बीजरोपे मरूही शकतात.

Share

कांद्याला चीर पडणे या वैगुण्याचे नियंत्रण

  • एकसमान सिंचन आणि खत घालण्याच्या पद्धतीचे पालन करून कंद फाटणे रोखता येते.
  • कंद सावकाश वाढणाऱ्या जातींची लागवड करून या वैगुण्याला आळा घालता येतो.
Share

कांद्याला चीर पडणे (शारीरिक वैगुण्य) कारणे

  • कांद्याच्या शेतातील असमान सिंचनामुळे या वैगुण्याचे प्रमाण वाढते.
  • अतिसिंचित शेते पूर्ण कोरडी झाल्यावर त्यांच्यात पुन्हा अतिरिक्त सिंचन केल्यास कंद फाटतात.
  • कंदावरील कीड अनेकदा कंद फाटण्याशी संबंधित असते.
  • सुरुवातीची लक्षणे कंदाच्या बुडाशी आढळून येतात. .
Share

वाटाण्यावरील करपा आणि मर रोगाचे नियंत्रण

  • निरोगी बियाणे वापरावे आणि कार्बनडाझिम + मॅन्कोझेब @ 250 ग्रॅम/ क्विंटल वापरून पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.  
  • फुलोरा येण्याच्या वेळी आणि त्यानंतर 10-15 दिवसांच्या अंतराने रोगग्रस्त पिकावर मॅन्कोझेब 75% @ 400 ग्रॅम/ एकर फवारावे. किंवा
  • रोगग्रस्त पिकावर थियोफानेट मिथाईल  70% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/ एकर फवारावे. किंवा
  • रोगग्रस्त पिकावर क्लोरोथ्रलोनील 75% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/  एकर फवारावे.
  • रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.   
  • पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था करावी.
Share

वाटण्यावरील करपा आणि मर रोग – लक्षणे आणि नियंत्रण

 

  • पानांवर जांभळ्या रंगाचे लहान डाग पडतात. ते वाढून करड्या रंगाचे, विशिष्ठ आकाराचे गोलाकार बनतात.
  • असेच व्रण खोडांवर देखील होतात आणि त्यांचा विस्तार वाढून खोड करड्या किंवा काळ्या रंगाचे होते.
  • शेंगांवर तपकिरी किंवा करड्या रंगाचे अनियमित आकाराचे गोल व्रण पडतात.
Share

कुसुम योजनेअंतर्गत सबसिडी कशी मिळवता येते

  • कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी शेतकऱ्यांना संचाच्या एकूण किंमतीच्या 10 टक्के रक्कम भरावी लागते. 
  • उरलेल्या रकमेपैकी 30 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून सबसिडीच्या स्वरुपात तर 30 टक्के रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येते. 
  • उरलेल्या 30 टक्के रकमेच्या एवढे कर्ज शेतकरी बँकेकडून घेऊ शकतो.  
  • बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी देखील सरकार शेतकऱ्यांना मदत करते. 
Share